zomato ceo deepinder goyal viral news: सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोबाबत एक भन्नाट बातमी समोर आली आहे. झोमॅटो कंपनीचे सीईओ दीपिंदर गोयल यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. आताही नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गोयल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण २०२२ च्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला गोयल स्वत: फूड डिलिव्हरी एजंट बनून त्यांच्या झोमॅटो कंपनीसाठी काम करताना दिसले. गोयल यांनी डिलिव्हरी एजंट बनून स्वत: ग्राहकांच्या फूड ऑर्डर घरी पोहचवल्या आणि कंपनीच्या कर्माचाऱ्यांसह ग्राहकांनाही आश्चर्याचा धक्का दिला. याबाबत गोयल यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करून त्यांनी घेतलेला अनूभव सर्वांसमोर मांडला आहे.
….जेव्हा झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल ग्राहकांना भेटतात
३१ डिसेंबर कुटुंबीयांसह मेजवाणी करून नवीन वर्षात नव्या जोशात संकल्प करून काम करण्याच्या तयारीत सर्वजण असतात. पण झोमॅटोची सीईओ गोयल कंपनीसाठी स्वत: फूड डिलिव्हरी करण्यासाठी बाहेर पडतात, हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. विशेष म्हणजे त्यांनी डिलिव्हरी एजंट म्हणून केलेलं काम ट्विटरच्या माध्यमातून जगसमोर आणलं. त्यांनाही हे काम करताना किती आनंद वाटला, याबाबत त्यांनी सूचक कॅप्शन देत ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं, “माझ्या पहिल्या ऑर्डरने मला झोमॅटो ऑफिसमध्ये परत आणलं.” एव्हढच नाही तर त्यांनी ग्राहकांना केलेल्या फूड डिलिव्हरीचा अनुभव दुसऱ्या ट्विटच्या माध्यमातून शेअर केला.
इथे पाहा दीपिंदर गोयल यांच्या ट्विटर पोस्ट
“मी आता स्वत:हून काही ऑर्डर्स डिलिव्हर करायला जात आहे. काही तासांतच पुन्हा परत येईल.” अशाप्रकारचं दुसरं ट्विट गोयल यांनी केलं. त्यानंतर अनुभव शेअर करताना गोयल म्हणाले, “ऑफिसमध्ये परत आलो. एक ज्येष्ठ कपल आपल्या नातवंडांसोबत नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करत होते. त्यांनाही आर्डर दिली.” “काय जबरदस्त दिवस होता…अखेर ही रात्रच वेगळी होती. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आमच्या ग्राहकांचे खूप खूप आभार. रेस्टॉरंटचे पार्टनर, डिलिव्हरी पार्टनर्स आणि सर्व टीमने २०२२ वर्षात केलेल्या अप्रतिम कामगरीबद्दल त्यांचेही आभार मानतो.”, असंही गोयल ट्विटरवर म्हणाले.