Zomato CEO Deepinder Goyal Marries Grecia Munoz: झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी मेक्सिकन उद्योजक ग्रीसिया मुनोजशी लग्न केले आहे. जोडप्याच्या जवळच्या व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर मनी कंट्रोलला दिलेल्या माहितीनुसार, गोयल व मुनोज यांचे लग्न एका महिन्यापूर्वी झाले होते आणि ते दोघे फेब्रुवारीमध्ये त्यांच्या हनीमूनवरून परतले होते. मेक्सिकोमध्ये जन्मलेल्या मुनोझने यापूर्वी मॉडेलिंग केले आहे आणि आता ती लक्झरी उत्पादनांच्या स्वतःच्या स्टार्टअपवर काम करत आहे. त्यावेळी मुनोज हिने तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये बदल करून ‘माझा जन्म मेक्सिकोमध्ये झाला आहे आणि मी आता भारतात, माझ्या घरी आहे.”अशा आशयाची ओळ जोडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राप्त माहितीनुसार, झोमॅटोचे सीईओ, गोयल यांचं हे दुसरं लग्न आहे. आयआयटी-दिल्लीमध्ये शिकत असताना त्यांची कांचन जोशी यांच्याशी भेट झाली होती, या दोघांनी लग्नगाठ बांधली पण काही कारणास्तव त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता गोयल हे दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाले आहेत.

जानेवारीमध्ये मुनोजने तिच्या ‘दिल्ली दर्शन’ करतानाच्या भटकंतीची झलक शेअर केली होती. “माझ्या नवीन घरात माझ्या नवीन आयुष्याची एक झलक,” असे मुनोझने इंस्टाग्रामवर लिहित तिने लाल किल्ल्यासहित राजधानी दिल्लीतील काही प्रसिद्ध स्मारकांच्या भेटीचे फोटो पोस्ट केले होते. या फोटोंवर भारतीय युजर्सनी कमेंट करून लग्नाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.

दीपंदर गोयल यांच्याविषयी सांगायचे झाल्यास, ४१ वर्षीय गोयल हे प्रसिद्ध फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे संस्थापक व सीईओ आहेत. २००८ मध्ये त्यांनी आपल्या राहत्या घरातूनच ही कंपनी सुरु केली होती व त्यावेळेस त्याचे नाव फूडीबे असे ठेवण्यस्त आले होते. सध्या झोमॅटोचा व्यवसाय हा भारतातील १००० हुन अधिक शहरांमध्ये पसरला आहे.

दरम्यान, बहुचर्चित व प्रसिद्ध असा हा झोमॅटोचा प्लॅटफॉर्म अनेकदा वादात सुद्धा सापडला आहे, अलीकडेच झोमॅटोने ‘शुद्ध शाकाहारी’ डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हजना वेगळी ओळख देण्यासाठी हिरव्या रंगाचा ड्रेस कोड घोषित केला होता. पण यावरून सोशल मीडियावर प्रचंड टीका झाल्याने कंपनीतर्फे हा निर्णय मागे घेण्यात आला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zomato ceo deepinder goyal second time marries model grecia munoz instagram bio makes indians happy says i am home see photos svs