Zomato CEO turned delivery boy: झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल आणि त्यांची मेक्सिकन पत्नी जिया गोयल (Gia Goyal-सnée Grecia Munoz), यांनी अलीकडेच डिलिव्हरी एजंट्सची भूमिका पार पाडली आणि वैयक्तिकरित्या संपूर्ण दिल्ली NCR मध्ये ऑर्डर डिलिव्हर केली. लाल झोमॅटोचे टी-शर्ट परिधान करून, जोडप्याने स्वत: घरोघरी जाऊन पार्सल डिलिव्हर केले.

याबाबत दीपंदर गोयल यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली, त्यात त्यांनी त्यांच्या या खास दिवसाचे फोटो शेअर केले; ज्यात ते बाईकवरून डिलिव्हरीसाठी जाताना दिसले. खांद्यावर डिलिव्हरी बॅग घेऊन घरोघरी पार्सल पोहोचवताना ते दिसले.

हेही वाचा… आता फक्त भावाचीच हवा; भर वर्गात केलं असं काही की पोरी झाल्या फिदा; VIDEO एकदा पाहाच

दीपंदर गोयल यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ते रस्त्याच्या मधोमध उभे राहून मॅप पाहताना दिसतायत, तर दुसऱ्या फोटोत ते डोक्यावर हेल्मेट घालून डिलिव्हरी बॅग आणि फोन हातात घेऊन डिलिव्हरीसाठी पत्ता शोधताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, ” Gia Goyal सह काही दिवसांपूर्वी ऑर्डर देण्यासाठी बाहेर गेले होते.”

युजर्सच्या प्रतिक्रिया

दीपंदर गोयल यांची पोस्ट पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं, कामाच्या पलीकडे कोणताही धर्म नसतो हे तुम्ही सिद्ध केलं आहे, यामुळे खूप लोकांना प्रेरणा मिळेल आणि या कामाला कोणीच छोटं म्हणून पाहणार नाही.” तर दुसऱ्याने “ज्या व्यवसायात मालक स्वतः राबतो तो व्यवसाय कधीच बुडत नाही” अशी कमेंट केली.

तर अनेकांनी त्यांच्या डिलिव्हरीचा अनुभव केला. एक जण कमेंट करत म्हणाला, “तुम्हाला अलामोड ऑफिसमध्ये पाहून आम्हाला खूप आनंद झाला. तुमच्या कामाबद्दल आणि तुम्ही उद्योजक आहात त्याबद्दल खूप आदर आहे!”, “तुमच्याकडून माझी ऑर्डर मिळाल्याबद्दल आभारी आहे,” असं आणखी एका युजरने लिहिलं.

हेही वाचा… “मम्मी मेरा फोन…”, विंडो सीटवर बसलेल्या लहान मुलीचा फोन चोराने केला लंपास, VIDEOमध्ये पाहा नेमकं काय घडलं?

झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी २००८ मध्ये पंकज चड्डासह कंपनीची सह-स्थापना केली. फूड डिलिव्हरी कंपनीची स्थापना करण्यापूर्वी, दीपंदर यांनी बेन अँड कंपनीमध्ये व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केले. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), दिल्ली येथून एकात्मिक पदव्युत्तर (इंटिग्रेटेड मास्टर्स) पदवी घेतली आहे.

दरम्यान, दीपंदर यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर जिया गोयलशी लग्न करण्यापूर्वी दीपंदर यांचे लग्न कांचन जोशी यांच्याशी झाले होते. दीपंदर यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, त्यांनी डेटिंग सुरू करण्यापूर्वी सहा महिने कांचन यांचा पाठलाग केला होता. कांचन जोशी सध्या दिल्ली विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापिका आहेत.

वर दिलेल्या गुगल ट्रेंड्सच्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता, गेल्या चोवीस तासांमध्ये २ हजारांपेक्षा अधिक युजर्सनी gracia munoz हा विषय सर्च केला आहे.