सोशल मीडियावर अनेकदा विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात, जे आश्चर्यकारक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला झोमॅटो फूड डिलिव्हरी बॉयला चप्पलेने मारहाण करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉय ऑर्डर देण्यासाठी जात होता, मात्र वाटेतच एका महिलेने त्याला चपलाने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तो डिलिव्हरी बॉय शांतपणे हे सर्व पाहत उभा होता आणि मार खात होता. हा व्हिडीओ पाहून लोकांनी महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हा व्हायरल व्हिडिओ १६ ऑगस्टचा आहे, जो @bogas04 नावाच्या आयडीसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. असा दावा करण्यात आला आहे की डिलिव्हरी बॉय त्याची ऑर्डर घेऊन जात होता, परंतु महिलेने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली, जी व्हायरल झाली. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘कुणीतरी महिलेने त्याच्याकडून ऑर्डर घेतली आणि त्याला चपलाने मारण्यास सुरुवात केली. तो माझ्या घरी रडत रडत आला आणि त्याला भीती वाटली की त्याची नोकरी जाऊ शकते.
( हे ही वाचा: सोनाली फोगटने केली होती सरकारी कर्मचाऱ्याला चप्पलने मारहाण; व्हिडीओ व्हायरल होताच झाला होता गोंधळ)
येथे पहा कशाप्रकारे महिला डिलिव्हरी बॉयला मारत आहे
( हे ही वाचा: VIDEO: आईची माया! भुकेल्या कुत्र्यांना महिलेने पाजले म्हशीचे दूध; या हृदयस्पर्शी व्हिडीओने जिंकली लोकांची मने)
ही घटना कुठे घडली आहे याचा उल्लेख व्हिडीओमध्ये करण्यात आलेला नाही. त्याचवेळी ही महिला कोण होती, डिलिव्हरी बॉयला चपलाने मारहाण करून ती का मारत होती, याची माहिती अद्याप मिळालेली नाही, तसेच महिलेवर कारवाई झाली की नाही, याचीही माहिती अजूनही मिळालेली नाही. हा व्हायरल व्हिडीओ अवघ्या ४५ सेकंदांचा असून आश्चर्यचकित करणारा आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर झोमॅटो केअरकडूनही रिप्लाय आला आहे की आम्ही त्याची चौकशी करत आहोत, पण त्यानंतर कोणतेही अपडेट अद्याप मिळालेली नाही.
त्याचबरोबर व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत. काहीजण झोमॅटोने अशा महिलांवर बंदी घालावी, असे म्हणत आहेत, तर काहीजण झोमॅटोला आपल्या डिलिव्हरी बॉईजची काळजी नाही असे देखील म्हणत आहेत.