सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा डिलिव्हरी बॉयचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहे. झोमॅटो, स्विगी या कंपन्याचे डिलिव्हरी बॉय काही ना काही कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी कोणाला कामाच्या व्यापातून जेवायला वेळ मिळत नाही म्हणून तर कधी काही ग्राहक झोमॅटो डिलिव्हरी बॉयला सरप्राईज देतात. दरम्यान, सध्या झोमॅटो डिलिव्हरी बॉय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि त्याचे कारणही तसं वेगळं आहे. झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयने आपल्या वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला आहे. चला जाणून घेऊ या काय आहे प्रकरण
झोमॅटो डिलिव्हरी बॉयने खास पद्धतीने साजरा केला त्याचा वाढदिवस
एकीकडे वाढदिवशी आपण अशी अपेक्षा करत असतो की, आपल्याला काहीतरी खास भेट मिळेल तिथे दुसरीकडे या डिलिव्हरी बॉयने अनोळखी लोकांना चॉकलेट देऊन त्याचा दिवस खास बनवला आहे. झोमॅटोबरोबर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या करण आपटे हा नुकताच ३० वर्षाचे झाला आहे आणि आपल्या वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याने या दिवशी दोन खास कामे केली आहे. पहिले म्हणजे त्याने स्वत:साठी एक नवीन शर्ट खरेदी केला आणि दुसरे म्हणजे ज्या ग्राहकांना त्यानी जेवणाची डिलिव्हरी दिली त्यांना चॉकलेट वाटले आहे.
हेही वाचा – ५ तास रिक्षा चालवून मिळाले फक्त ४० रुपये, रिक्षाचालकाला कोसळले रडू, Viral Videoमध्ये सांगितली व्यथा
लोकांनी केले झोमॅटो डिलिव्हरी बॉय कौतुक
आपटे यांने २१ जून रोजी आपल्या फेसबुकवर आपल्या मित्रांसोबत शेअर केले आहेत. त्याने पोस्टमध्ये लिहले आहे की, आज माझा वाढदिवस आहे. मी एक नवीन शर्ट खरेदी केला आणि झोमॅटो डिलिव्हरीसाठी आलेल्या प्रत्येक आर्डरसह चॉकलेट वाटले. पोस्टसह त्याने फोटो देखील शेअर केले आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लोकांनी त्याच्या पोस्ट शेअर करून त्याचा वाढदिवस आणखी खास केला आहे आणि त्याच्या या कृतीचे कौतुक केले आहे.
हेही वाचा – Louis Vuittonने तयार केली मीठाच्या दाण्यापेक्षा छोटी बॅग! लोक म्हणाले, ‘कशाला बनवली भाऊ?’
लोकांनी झोमॅटोकडे केली ही मागणी
काही यूजर्सने झोमॅटोला टॅग करून त्याचा वाढदिवस साजरा करण्याची आणि त्याला गिफ्ट देण्याची मागणी केली. लोकांनी झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे कमेंट करून भरभरून कौतुक केले.