Zomato Delivery Boy: ऑनलाइन फूड डिलिव्हर अॅपमुळे आपले जीवन किती सहज आणि सोपे झाले आहे. आपल्या आवडीच्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करू शकतो आणि त्वरित आपल्या दरवाज्यावर जेवणाची डिलिव्हरी मिळवू शकता. पण तुमच्या दारात जेवण पोहचवणाऱ्या डिलिव्हरी करणआऱ्यांबाबत विचार केला आहे का? त्यांना किती समस्यांचा सामना करावा लागतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका मागे एक ऑर्ड मिळाल्यानंतर वेळेत पोहचण्यासाठी कित्येकदा उपाशी पोटीच काम करतात. कित्येकांना जेवयाला देखील वेळ मिळत नाही. याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. यामध्ये एक झोमटो डिलिव्हरी बॉय एका प्लास्टिकच्या पिशवी जेवताना दिसत आहे.

प्लास्टिकच्या पिशवी जेवणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘या सीझनमध्ये त्यांचीही काळजी घ्या. या २० सेकंदाच्या व्हिडिओला ३१३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून आणि ९.८ लाख लोकांनी त्याला पसंती दर्शवली आहे आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे. हा व्हिडिओ रहिवासी भागातील आहे जिथे हा डिलिव्हरी बॉय प्लास्टिकच्या पिशवीतून अन्न खाताना दिसत आहे. हा माणूस बाईकवर प्लास्टिक पिशवी ठेवून उभा आहे ज्यामध्ये भात असल्याचे दिसते. हा व्यक्ती फूड डिलिव्हरी करण्यासाठी आल्याचे दिसते आहे पुढची ऑर्डर मिळण्यापूर्वी तो पटकन काहीतरी पोटात टाकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते आहे.

हेही वाचा – बापरे! डोळ्यादेखत एटीमएम मशीनमध्ये शिरला भल्ला मोठा साप! Viral Video पाहून अंगावर येईल काटा

व्हिडिओ पाहून लोक झाले भावूक

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर लोकांनी व्हिडिओनर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने लिहिलेय, सर्विस प्रोव्हायडर क्षेत्रातील कामगार दररोज उभे राहून काम करत असल्याबद्दल कौतुकास पात्र आहेत.” दुसर्‍यानेने लिहिलेय, “त्यांना शांततेत जेवायलाही वेळ मिळत नाही हे पाहून खूप वाईट वाटते!” तर आणखी एकाने लिहिलेय ते जेव्हा सेवा देण्यासाठी तुमच्यापर्यंत येतात तेव्हा तुम्ही तुम्हाला जमेल तशी सेवा करू शकता.’
एकाने लिहलेय, ”आमचे अन्न वेळेवर पोहोचेल याची खात्री करण्यासाठी, ते अनेकदा उपाशी राहतात किंवा त्यांचे अन्न सोडून देतात. हे एक दुःखद वास्तव आहे आणि दृश्ये हृदयाला भिडणारी आहेत.”

हेही वाचा – भटक्या कुत्रीचं केलं ‘Baby Shower’; व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘नसबंदी…’

काहींनी व्हिडिओचा केला निषेध

डिलिव्हरी बॉयचा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक लोकांनी व्हिडिओ तयार करण्याबाबत विरोध व्यक्त केला आहे. लोकांनी सांगितले की यापुढे बिचारा मुलगा किंवा व्यक्ती असे जेवायला देखील घाबरेल की कोणी व्हिडिओ बनवला तर? त्याच वेळी, अनेकांनी सांगितले की पुढच्या वेळी मी नक्कीच डिलिव्हरी बॉयला किमान पाणी विचारेन.

अलिकडच्या काळात स्पर्धा पाहता Swiggy, Zomato, Grofers, Zepto, Big Basket सारख्या खाद्यपदार्थ आणि किराणा सामानाची डिलिव्हरी अॅप्स ३० मिनिटांपेक्षा कमी वेळेत ऑर्डर देऊ लागले आहेत (काही अॅप्स १० मिनिटांपेक्षा कमी वेळेत ऑर्डर देतात) ज्याचा निश्चितपणे परिणाम होतो डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीवर होतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zomato delivery boy eating dal rise from plastic bag netizens say heartbreaking watch viral video snk
Show comments