zomato delivery boy video: तुम्हीही कधीतरी ऑनलाईन फूड ऑर्डर केलंच असेल. हे फूड डिलिव्हरी करणारे झोमॅटो डिलिव्हरी बॉय अनेकदा चर्चेत येतात. दिवसभर उन्हा-तान्हात अगदी भरपावसातही हे डिलिव्हरी बॉय मेहनत करताना दिसतात. मात्र यावेळी याच झोमॅटो डिलिव्हरी बॉयची दुसरी बाजू समोर आली आहे. एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या डिलिव्हरी बॉयची महिन्याची कमाई एकून तुम्हीही थक्क व्हाल. नुसतं थक्कच होणार नाही तर म्हणाल आपण पण करायचं का हे काम सुरु? थांबा आधी व्हिडीओ पाहा आणि मग ठरवा.

सध्या सोशल मीडियावर एक झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यानं जे कमवण्याचं गणित सांगितलं आहे, ते ऐकून सर्वजण चाट पडले आहेत. या मुलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, त्याला विचारतात, तु पोटापाण्यासाठी काय करतोस, त्यावर तो पहिल्यांदा उत्तर देतो की, झोमॅटो. त्यानं जे झोमॅटोचं टि-शर्ट घातलेलं असतं त्यावर तो बोट दाखवतो.

e cycle ferry for Mahapex 2025 exhibition in Mumbai reached Nashik Roads Head Post Office on Thursday
इ सायकल फेरीत नाशिकमधील टपाल कर्मचाऱ्यांचा सहभाग
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत

कसे कमावतो ४५,००० हजार?

पुढे तो सांगतो झोमॅटोकडून अपेक्षेपेक्षा जास्त पैसे कसे कमवत आहे.शिवाय ही डुकाटी बाईक देखील माझीच आहे, असं देखील सांगताना दिसत आहे. त्याच्या आलिशान डुकाटी बाईकबद्दल प्रश्न विचारला असता, तो याचे देखील भन्नाट उत्तर देताना दिसतो. यावेळी तो फूड डिलिव्हरी करून कंपनीकडून महिन्याला तब्बल ४५,००० हजार रुपये मिळवत असल्याचे सांगताना दिसतो. हे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही त्यामुळे हा व्हिडीओ पाहा.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मृत्यू जवळ आला पण चमत्कार झाला; दैव बलवत्तर म्हणून ‘तो’ असा वाचला, पाहा थरारक VIDEO

त्यानंतर तो दिवसभर कशा ऑर्डर घेतो, पोहचवतो याबद्दल सांगतो. यावेळी त्याच्याकडे असलेल्या गाडीचा त्याला मोठा फायदा होत असल्याचंही तो सांगतो. यावेळी प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला तो तू पण आता सगळं सोडून झोमॅटोची नोकरी पकडं असं सांगत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरीही त्याची कमाई ऐकून अवाक् झाले आहेत.

Story img Loader