Zomato Delivery Boy Viral video : ऑनलाइनच्या जगात आता लोक घरी बसून कोणतीही गोष्ट ऑर्डर करतात. अगदी साबणापासून ते कडधान्यापर्यंत आणि औषधांपासून ते जेवणापर्यंत सर्व काही ऑनलाइन ऑर्डर करतात. त्यानंतर काही तासांत डिलिव्हरी बॉय ऑर्डर केलेल्या सर्व वस्तू तुमच्या घरापर्यंत घेऊन येतो. घरी, कॉलेज किंवा ऑफिसमध्ये असताना जेवण ऑर्डर करून खाणे ठीक आहे. कारण- तिथे डिलिव्हरी बॉय सहज पोहोचू शकतो; पण हल्ली लोक ट्रॅफिकमध्येदेखील ऑनलाइन फूड ऑर्डर करीत असल्याचे दिसून येते. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ट्रॅफिक जाममध्ये एका ग्राहकाने ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲपवरून जेवण ऑर्डर केले, यावेळी त्याने ट्रॅफिक जाममध्येच डिलिव्हरी बॉयला बोलावले. मुसळधार पावसात डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आला; पण त्याला गाडी कोणती हे शोधणं फार अवघड जात होतं. अशा प्रकारे ऑनलाइन ऑर्डर करणं म्हणजे मुद्दाम एखाद्याला त्रास देण्यासारखं आहे, हे वागणंच मुळात खूप अमानवी आहे, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया आता अनेक जण देत आहेत.

Read More Today’s Trending News : वंदे भारत ट्रेन चालविण्यावरून लोको पायलटमध्ये तुफान राडा; धक्काबुक्की करीत फाडले एकमेकांचे कपडे अन्…; Video व्हायरल

ऑर्डर पोहोचवताना डिलिव्हरी बॉयच्या नाकीनऊ

डीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, खूप मुसळधार पाऊस सुरू असून, रस्त्यावर तुफान ट्रॅफिक आहे. अशा परिस्थितीत कोणालाही घराबाहेर पडण्याची इच्छा होणार नाही. पण, एक डिलिव्हरी बॉय पोटासाठी मुसळधार पावसातही भिजत ऑर्डर पोहोचवताना दिसतोय. एका ग्राहकाने ट्रॅफिकमध्ये फसलेल्या गाडीत बसून ही जेवणाची ऑर्डर दिली होती; पण ती ऑर्डर पोहोचवताना डिलिव्हरी बॉयला खूप त्रास झाला. कारण- रस्त्यावर सर्वत्र गाड्या आणि त्यात आपल्या ग्राहकाला शोधताना त्याला अडचण येत होती. अशा प्रकारे डिलिव्हरी बॉयला त्रास होत असल्याचे पाहून लोकांनी दु:ख व्यक्त केले, तसेच अशा परिस्थितीत जेवण ऑर्डर करणाऱ्या ग्राहकावर लोक संतापले. लोकांनी व्हिडीओवर कमेंट्स करीत ग्राहकाला फटकारले. हा व्हिडीओ गुडगाव-मेहरौली रोडवर घेतला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे, जो लोक सोशल मीडियावर तुफान शेअर करीत आहेत.

Delhivisit नावाच्या पेजवरून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स डिलिव्हरी बॉयच्या मेहनतीला सलाम करीत आहेत; तर अनेक युजर्स फूड ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीला शिव्याही देताना दिसत आहेत.

“डिलिव्हरी बॉयला कशाला त्रास” ऑर्डर देणाऱ्यावर युजर्स संतप्त

एका हातात फोन आणि दुसऱ्या हातात फूड पॅकेट घेऊन झोमॅटोचा ड्रेस घातलेला एक डिलिव्हरी बॉय पावसात भिजत अस्वस्थपणे ग्राहकाचा शोध घेत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. परंतु, गाडीत आरामात बसून ऑर्डर देणाऱ्या व्यक्तीला त्याची काही चिंता नाही. ट्रॅफिक जाममध्ये ग्राहकाची कार शोधणे हे कोणासाठीही लहान काम नाही. त्यामुळे डिलिव्हरी बॉयसाठीदेखील हे काम आव्हानापेक्षा कमी नव्हते.

व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सना ग्राहकाची ही कृती अजिबात आवडली नाही. काही युजर्सनी कमेंट्स केल्यात की, यावेळी फूड ऑर्डर करण्याचा नेमका काय अर्थ आहे. त्याला जर एवढीच भूक होती, तर त्याने गाडीतून उतरून डिलिव्हरी घ्यायला यायला पाहिजे होते. डिलिव्हरी बॉयला कशाला त्रास दिला.