मुंबई एक असं शहर, जे स्वप्नांचं शहर म्हणून ओळखलं जातं. मुंबई स्वप्ननगरी आहे. या स्वप्ननगरीत सारेच आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात. भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं मुंबई शहर अतिशय वेगाने विस्तारत आहे. ‘ये मुंबई मेरी जान’, असं प्रत्येक मुंबईकर अभिमानाने म्हणतो. आर्थिक राजधानी असलेली ही मुंबई प्रत्येक व्यक्तीसाठी मायानगरी आहे, त्याचप्रमाणे आशेचा किरण आहे. या मुंबई शहरात कोणतीही व्यक्ती किंवा परकीय व्यक्ती उपाशी मरत नाही. काही ना काही करून स्वतःचं पोट भरतो कुटुंब चालवतो. असाच सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तरुणाने छोट्या खोल्यांमध्ये राहून आपलं जीवन कसे जगत असल्याचं, सांगितलं आहे.
मुंबईत तुम्हाला सर्व प्रकारची माणसे मिळतील. तुम्हाला असे लोकही सापडतील जे महिन्याला १० हजार रुपयांवर जगतात आणि असेही लोक सापडतील जे महिन्याला करोडो रुपये खर्च करतात. ज्यांच्याकडे थोडे पैसे आहेत ते फ्लॅटमध्ये राहतात आणि ज्यांच्याकडे पैशांची कमतरता नाही ते मोठ्या बंगल्यात राहतात. पण, मुंबईतही एक विभाग आहे, जे शहरातील झोपडपट्टी भागातही भाड्याच्या खोलीत राहतात. अशाच एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो माचिसच्या पेटीएवढ्या लहान खोलीत राहतो. मुलगा दरमहा ५०० रुपये भाडे देतो, पण जेव्हा तुम्ही त्याची खोली पाहाल तेव्हा तुम्हाला दिसेल की, ती तुमच्या बाथरूमपेक्षाही लहान आहे.
(हे ही वाचा : छातीवर बसून डोकं जमिनीवर आपटलं अन् दाबला गळा, पोटच्या मुलाला आईनेच केली मारहाण; व्हिडीओही बनवलं, पण सत्य…)
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
तरुणाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट @qb__.07 वर व्हिडीओ शेअर केला असून त्याने त्याची खोली दाखवली आणि तिथली त्याची अवस्था सांगितली. मुलगा Zomato मध्ये काम करतो. तो एका खोलीत राहतो, ज्याचे भाडे ५०० रुपये आहे आणि ही खोली एका व्यक्तीसाठी योग्य आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, मुंबईतील लोक इतक्या छोट्या खोल्यांमध्ये राहून आपले जीवन जगत आहेत. मुलाने सांगितले की, तो या खोलीत राहतो आणि तो खूप आजारी होता. अशा काळात त्याच्या उपचारासाठी त्याच्या कुटुंबीयांनी मोठा खर्च केला. त्यामुळे त्याला अत्यंत काटकसरीने जीवन जगावे लागत आहे.
येथे पाहा व्हिडिओ
मुलाने पुढे सांगितले की, तो त्याच्या राहण्या-खाण्यावर जास्त पैसा खर्च करू शकत नाही, त्यामुळे तो अजूनही या छोट्याशा खोलीत राहतो. हा मुलगा पुढे व्हिडीओमध्ये दाखवतो की, तो एका अतिशय अरुंद गल्लीतून जात एका ठिकाणी पोहोचतो, जिथे वर जाण्यासाठी लोखंडी जिना आहे. जेव्हा तो वर पोहोचतो तेव्हा तो आणि आणखी एक-दोन लोक त्याच्यासोबत राहतात. खोलीत आवश्यक वस्तू एकमेकांवर रचलेल्या दिसत आहेत. मुलाने स्वत:साठी ५० रुपये किमतीची बिर्याणी आणली होती, ती खाऊन तो कामावर निघून जातो. मुलाच्या या व्हिडीओला जवळपास ३० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करून आपापल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.