झोमॅटो ही लोकप्रिय आणि नेहमी चर्चेत असणारी फूड डिलीवरी कंपनी आहे. झोमॅटो डिलीवरी बॉयचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डिलीवरी बॉय भररस्त्यात डान्स करत असल्याचे दिसत आहे. या व्यक्तीच्या कपड्यांवरून आणि त्याच्या गाडीवर असणाऱ्या डिलीवरी बॉक्सवरून तो ‘ऑन ड्युटी’ असल्याचे दिसत आहे. मग तरीही वेळेत ऑर्डर पोहचवण्याऐवजी हा असा डान्स का करत आहे, असा प्रश्न पडतो. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : नीलगाईला लांबून पाहताच वाघाने केले असे काही की…; थक्क करणारा व्हिडीओ होतोय Viral

या व्हायरल व्हिडीओमध्ये या डिलीवरी बॉयला डान्स करताना पाहून नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘आम्हाला वाटले ट्रॅफिकमुळे जेवणाची ऑर्डर उशीरा येत होती, पण फक्त तेच कारण नसल्याचे या व्हिडीओवरून समजत आहे’ अशा कमेंट्स काही नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काहींनी या डिलीवरी बॉयच्या डान्स स्किलचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zomato delivery boy starts dancing on the middle of the road netiznes react with worry pns