Viral Video : सोशल मीडियावर डिलिव्हरी बॉयचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डिलिव्हरी बॉय उन्हापासून वाचण्यासाठी जुगाड करताना दिसतो तर कधी डिलिव्हरी बॉय Harley Davidson दुचाकी चालवताना दिसतो. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे डिलिव्हरी बॉय चर्चेत येतो. सध्या एका वेगळ्याच कारणाने एका डिलिव्हरी बॉयची चर्चा सुरू आहे. बंगळूरूमध्ये एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयने ग्राहकाची ऑर्डर दिल्यानंतर दारावर असलेले दुसरे खाद्यपदार्थ चोरले. ही चोरी सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Zomato Delivery boy Stealing Food parcel on door in Bengaluru Caught On Camera video goes viral Zomato said sorry)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक डिलिव्हरी बॉय एका फ्लॅटसमोर येतो आणि बेल वाजवतो त्यानंतर एक व्यक्ती दरवाजा उघडते आणि ऑर्डर केलेले फूड घेते आणि दरवाजा बंद करते त्यानंतर डिलिव्हरी बॉय दरवाज्यासमोरच थांबतो आणि दरवाज्यासमोर खाली ठेवलेले दुसरे खाद्यपदार्थ उचलतो आणि बरोबर घेऊन जातो. खाद्यपदार्थ चोरतानाची घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद होते.

Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Person stuck in traffic got bored and ended up doing this video
एकीकडे ट्रॅफिक जाम दुसरीकडे वडिलांचे १५ मिस कॉल्स; तरुणानं केलं असं काही की VIDEO पाहून पोट धरुन हसाल
If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
Viral Video: Girl's Rain Dance Interrupted By Thunderbolt Scare shocking video
VIDEO: निसर्गापुढे माणूस दुबळाच! ‘ती’ रील्स बनवत होती आणि वीज पडली; तुम्हीच सांगा तरुणीचं काय चुकलं?
Man wrote message for his wife in back of the car
नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Pune hotel menu card viral on social media punekar swag puneri pati viral
पुणे तिथे काय उणे! हॉटेलच्या मेन्यू कार्डवर महिलांसाठी सूचना; वाचून म्हणाल “पुणेकरांना एवढा कॉन्फिडन्स येतो तरी कठून?”
How Do Shopkeepers Cheat Desi Jugaad Video Viral on social Media
फळ-भाजी विक्रेते तराजूने कशी फसवणूक करतात बघा; पुढच्या वेळी नुकसान टाळायचं असेल तर ‘हा’ VIDEO पाहाच

हेही वाचा : काँग्रेसच्या युवा नेत्या रोशनी कुशल जयस्वाल यांचा Video Viral; हेल्मेटविनाच चालवली बाईक, नेटकरी म्हणाले, “कडक कारवाई…”

adityakalra या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “
आम्ही बंगळुरूमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉयला सीसीटिव्ही कॅमेऱ्यात चोरी करताना पकडले. तो ऑर्डर डिलिव्हर करतो आणि त्यानंतर आमचे दारावर असलेले दुसरे खाद्यपदार्थ हळूच उचलतो आणि घेऊन जातो. खरच हे धक्कादायक आहे.”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : सहा सिंहाच्या तावडीत सापडला एकटा झेब्रा, एकापोठापाठ एक सिंह मारत होता झडप तरी…. Viral Videoमध्ये पाहा थरारक शिकार!

या व्हिडीओवर झोमॅटोने प्रतिक्रिया दिली आहे. झोमॅटोने डिलिव्हरी बॉयवर कठोर कारवाई करण्याचे आणि या घटनेचा तपास करण्याचे सांगितले आहेत.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बिचाऱ्याला भूक लागली असेल” तर एका युजरने लिहिलेय, “कॅमेरा स्थिर का नाही? स्क्रिप्टेड वाटत आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “अन्नाची चोरी हा गु्न्हा असू शकतो?”

काही महिन्यांपूर्वी असाच एक व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओमध्ये डिलिव्हरी बॉय एका महिलेच्या घराबाहेरील शूज चोरताना दिसला होता. त्यावेळी त्या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.