Zomato Delivery Boy Viral Video: आनंद व्यक्त करायला वेळ-काळ बघितला जात नाही. आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असतो. काही जण आपल्या भावना बोलून व्यक्त करतात, काही जण गोष्टी मनातच ठेवतात तर काही डान्सद्वारे किंवा एखादं गाणं गाऊन आपल्या भावना व्यक्त करतात.

कोणत्याही माणसाला असं आनंदी, खूश पाहिलं की आपल्यालादेखील त्याचा दुप्पट आनंद होतो. दुसऱ्याच्या सुखात सुख मानणं यापेक्षा सुंदर कोणती भावना नाही हे खरंय. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात डिलिव्हरी बॉय खूप खूश दिसत आहे आणि तो चक्क डान्स करता करता गाडी चालवतोय.

scooter caught fire man urinated on it crazy video viral on social media
त्याने पॅंटची चेन उघडली अन्…, स्कूटरने पेट घेताच तरुणांनी काय केलं पाहा, VIDEO पाहून कपाळावर माराल हात
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
pushpa in Kolhapur
कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा! चिमुकले घाबरले तर मोठ्यांनी काढली सेल्फी, पाहा VIRAL VIDEO
UBER and Rapido bike drivers earn 80 thousand rupees per month
याला म्हणतात कष्ट! Uber अन् Rapido दुचाकीचालक महिन्याला कमावतो ८० हजार रूपये, VIDEO एकदा पाहाच
a woman forgot her husband while talking on a call
मोबाईलच्या नादात चक्क नवऱ्याला विसरली, पेट्रोल पंपावर आली नवऱ्याबरोबर पण.. VIDEO होतोय व्हायरल
a child playing amazing dholaki video goes viral
नाद असावा तर असा! अफलातून ढोलकी वाजवतो हा चिमुकला, VIDEO एकदा पाहाच
a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Wedding bride dance video
“है आज कल किस हाल में तू” म्हणत नवरीने स्वत:चीच हळद गाजवली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल

हेही वाचा… VIDEO: भयंकर प्रकार! पिसाळलेल्या बैलाने धडक देताच स्कूटरचालक आला गाडीच्या खाली अन्…, पुढे जे घडलं ते पाहून उडेल थरकाप

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत झोमॅटोची डिलिव्हरी करणारा डिलिव्हरी बॉय खूप आनंदात दिसतोय. भररस्त्यात तो आपला आनंद डान्स करून व्यक्त करतोय. पण, हा आनंद व्यक्त करण्याचा त्याचा प्रकार काहीसा हटकेच आहे. हा डिलिव्हरी बॉय आपलं दिवसभराचं काम संपवून रात्री बाईकवरून घरी परतताना दिसतोय. कानात इअरपॉड्स लावून गाणी एन्जॉय करत तो बाईक चालवतोय. एवढंच नाही तर बाईक चालवता चालवता तो हात मोकळे सोडून डान्सदेखील करत आहे. डिलिव्हरी बॉयच्या या कृतीने सगळ्यांचं लक्ष मात्र वेधून घेतलंय.

हा व्हिडीओ @emadahmadsafi या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “एका डिलिव्हरी बॉयने आमचा दिवस अगदी खास केला” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून या व्हिडीओला तब्बल ७.१ मिलियन व्ह्यूज आले आहेत. “मी जेव्हा माझ्या क्रशला फूड डिलिव्हर करतो तेव्हा…” असंही या व्हिडीओवर लिहिण्यात आलं आहे.

हेही वाचा… भांडुपमध्ये जलप्रवाहात माणसाचा गेला तोल अन्…, मुसळधार पावसात पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “प्रत्येक परिस्थितीत जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे”, तर दुसऱ्याने काळजी व्यक्त करत कमेंट केली की, “या सगळ्यानंतर त्याची नोकरी जायला नाही पाहिजे.” तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “भावाचा आनंद काहीतरी वेगळाच आहे.”

दरम्यान, याआधीही सोशल मीडियावर डिलिव्हरी बॉईजचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यात एक डिलिव्हरी बॉय रस्त्यावर डान्स करताना दिसला, तर एकाने ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर चक्क चपलांची चोरी केली.

Story img Loader