तुम्हीही कधीतरी ऑनलाईन फूड ऑर्डर केलंच असेल. ही फूड डिलिव्हरी करणारे डिलिव्हरी बॉय अनेकदा चर्चेत येतात. दिवसभर उन्हा-तान्हात अगदी भरपावसातही हे डिलिव्हरी बॉय मेहनत करताना दिसतात. डिलिव्हरी बॉयचा असाच एक इमोशनल व्हिडीओ सध्या समोर आला आहे. डिलिव्हरी बॉयचा असाच एक इमोशनल व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. झोमॅटो डिलिव्हरी एजंट आपल्या लहान मुलीला कुशीत घेऊन त्याच्या ग्राहकाला अन्न पोहोचवत असल्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. अनेक लोकांनी माणसाबद्दल सहानुभूती दाखवली, तर काहींनी त्याच्या मेहनतीचे कौतुक केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, झोमॅटो डिलिव्हरी एजंट आपल्या लहान मुलीला कुशीत घेऊन त्याच्या ग्राहकाला अन्न पोहोचवत असल्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. अनेक लोकांनी माणसाबद्दल सहानुभूती दाखवली, तर काहींनी त्याच्या मेहनतीचे कौतुक केलं.

लेकीला पोटाशी घेऊन संघर्ष

डिलिव्हरी बॉयने पाठीवर झोमॅटो बॅग आणि पुढच्या बाजूला बाळाची बेबी कॅरियर बॅग लटकवली आहे. आपल्या लहान बाळाला पोटाशी बांधून फूड डिलिव्हरीची जबाबदारी हा व्यक्ती पार पाडत आहे. हे पाहून ब्लॉगरचे सुद्धा हृदय पिळवटून गेले आणि त्याने त्याच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी दुसरा मुलगाही त्याच्यासोबत होता. व्हिडीओमध्ये तो व्यक्ती सांगतो की तो दिवसभर उन्हात त्याच्या मुलांसोबत असे फूड डिलिव्हरी करतो. हा झोमटो फूड डिलिव्हरी एजंट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलाय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – वाह उस्ताद वाह ! स्पायडरमॅनने वाजवला जबरदस्त तबला, Viral videoला आतापर्यंत लाखो व्ह्यूज

डिलिव्हरी बॉयची मेहनत पाहून सोशल मीडियावर अनेक जण त्याचं कौतुक करत आहेत, अनेक नेटकरी या इमोशनल व्हिडीओच्या खाली कमेंट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ अनेकांनी रिशेअरही केला आहे. अशा गरजू लोकांनी नक्की मदत करा, असं एका यूजरने म्हटलं आहे.हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करत आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला आहे की आतापर्यंत या व्हिडीओला ७.९ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ मिलियन लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zomato delivery boy went to door to deliver food with baby girl in his lap customer shocked video viral on social media srk
Show comments