भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान ३’ ने यशस्वी प्रक्षेपण केले. काल (१४ जुलै) दुपारी २.३५ मिनिटांनी चंद्रायानाचे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आले. २३ ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल असं बोललं जात आहे. चांद्रयान ३ ने यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर राजकीय नेत्यांसह अनेक कलाकारांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केली आहेत.
तर सोशल मीडियावरही ‘चांद्रयान-३’ मोहिमेला शुभेच्छा देणारे अन् इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करणारे फोटो, मेसेजेस, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये Zomato, Swiggy Instamart, दिल्ली मेट्रो यांच्यासह मुंबई आणि UP पोलीसांनीदेखील चांद्रयान ३ प्रक्षेपणा संदर्भात काही मनोरंजक ट्विट केली आहेत.
फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोने इस्रोलो शुभेच्छा देण्यासाठी पारंपारिक पद्धतीचा अवलंब केला आहे. Zomato च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शुभेच्छा देताना लिहिलं आहे, आम्ही @ISRO च्या चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी आम्ही दही साखर पाठवत आहोत.
दिल्ली मेट्रोनेदेखील अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये चंद्राचा फोटो पोस्ट करत आमचं पुढील स्टेशन चंद्र असल्याचं त्यांनी लिहिलं आहे. तसंच इस्रोच्या या नवीन मिशन यशस्वी व्हावे यासाठी आमच्या शुभेच्छा असल्याचंही या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तर मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे, “@isro आम्ही चंद्रावर जात आहोत, तिथे तुम्हाला लवकरच भेटू.” यावेळी ट्विटमध्ये चांद्रयान ३ चा मोठा फोटोदेखील शेअर करण्यात आला आहे.
तर यूपी पोलिसांनी ५ ते शुन्यापर्यंत आकडे टाकत काऊंट डाऊन दिला आहे आणि लिहिलं आहे, अचूक वेळ आणि योग्य मार्ग अपघातांसाठी जागा सोडत नाही. @isro ला चांद्रयान ३ यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा, असं यूपी पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.
तर स्विगी इंस्टामार्टने वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी चांद्रयान ३ ला एक लहान लिंबू आणि मिर्चा जोडल्या आहेत.
या मजेदार आणि भन्नाट ट्विटवर नेटकरीदेखील अनेक प्रतिक्रिया देत आहेत. तर अनेकांनी या पोलिसांसह या कंपन्याचे कौतुक देखील केल्याचं पाहायला मिळत आहे.