झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल आणि त्यांची पत्नी ग्रेसिया मुनोझ यांनी अलीकडेच फूड डिलिव्हरी एजंटची नोकरी स्वीकारून डिलिव्हरी अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा अनुभव घेतला. रविवारी, गोयल यांनी एक व्हिडिओ शेअर केला ज्यात खुलासा केला आहे की, फुड डिलिव्हरी करताना त्यांना गुरुग्रामच्या ॲम्बियन्स मॉलचे मुख्य प्रवेशद्वार वापरण्यापासून रोखण्यात आले, ज्यामुळे त्यांच्याकडे पायऱ्या चढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झोमॅटोचे सीईओ झाले फूड डिलिव्हरी बॉय

एका व्हिडिओमध्ये, गोयल, जो झोमॅटो डिलिव्हरी एजंटचा गणवेश परिधान करून फूड डिलिव्हरी करताना दिसत आहे.व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितले की,”कंपनीच्या हे लक्षात आले आहे की, त्यांनी डिलिव्हरी एजंटच्या कामाची परिस्थिती सुधारण्यासाठी मॉल्सशी हातमिळवणी केली पाहिजे. “माझ्या दुसऱ्या ऑर्डर दरम्यान, मला जाणवले की, सर्व डिलिव्हरी बॉयसाठी कामाची परिस्थिती सुधारण्यासाठी आम्हाला मॉलबरोबर चांगले संबध निर्माण करून काम करण्याची आवश्यकता आहे आणि मॉल्स देखील डिलिव्हरी बॉयसाठी अधिक मानवी वर्तणूक करणे आवश्यक आहे,” असे व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा – “सुरजबरोबर प्रत्येक सामान्य व्यक्तीचा विजय”, जर्मनीमध्येही सुरज चव्हाणच्या विजयाचा जल्लोष, पाहा Viral Video

गोयल यांना मॉलमध्ये अडवले

पुढे, गोयल शेअर करतात की आम्ही हल्दीरामची ऑर्डर घेण्यासाठी गुरुग्राममधील ॲम्बियन्स मॉलमध्ये पोहोचलो. मला दुसरे प्रवेशद्वार घेण्यास सांगण्यात आले आणि ते मला पायऱ्या चढण्यास सांगत आहेत हे लक्षात आले. डिलिव्हरी बॉयसाठी कोणतेही लिफ्ट नाहीत याची खात्री करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर पुन्हा आत गेलो,” असे तो म्हणाला.

झोमॅटोच्या सीईओने दावा केला की, “डिलिव्हरी एजंट्सना फूड ऑर्डर घेण्यासाठी पायऱ्यांवर थांबावे लागते हे कळल्यावर त्यांनी तिसऱ्या मजल्यावर पायऱ्या चढून जावे लागते.

येथे पाहा Video

हेही वाचा – Google introduces UPI Circle in India: Googleवर ट्रेंड होत असलेले हे UPI सर्कल आहे तरी काय? कसे वापरावे, जाणून घ्या सर्वकाही

गोयल यांनी डिलिव्हरी एजंट्सबरोबर साधला संवाद

आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गोयल इतर डिलिव्हरी एजंट्ससह जमिनीवर बसून गप्पा मारताना दिसत आहेत. “माझ्या सहकारी डिलिव्हरी बॉयसह शांतपणे बसलो आणि त्यांच्याकडूनही मौल्यवान अभिप्राय मिळतो,” असेही तो पुढे म्हणाला.

एक दशलक्षाहून अधिक व्ह्यूजसह व्हिडिओने त्वरीत आकर्षण मिळवले, असंख्य प्रतिक्रिया निर्माण केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “प्रत्येक सोसायटी, प्रत्येक मॉल आणि प्रत्येक कार्यालयाने डिलिव्हरी बॉयला सामान्य लोकांप्रमाणे नियमित लिफ्ट आणि प्रवेश देणे अनिवार्य केले पाहिजे. कोणताही भेदभावा नसावा.”

दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, ” सीईओ डिलिव्हरी बॉय यांच्यात एक जोडलेला कल्चर ट्रेंड आणि स्वत: हून समस्या अनुभवणे ही एक चांगली गोष्ट आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zomatos deepinder goyal reveals gurugram mall stopped him from using main entrance elevator while making food deliveries watch snk