तुम्ही जेव्हाही Zomato वरून फूड ऑर्डर करत असाल, तेव्हा काही मिनिटांत डिलिव्हरी होत असते. पण आज आम्ही तुम्हाला आईस्क्रीम डिलिव्हरीचा असाच एक मजेदार व्हिडीओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्ही तुमचे हसू आवरू शकणार नाहीत. खरं तर, आइस्क्रीम डिलिव्हर करण्याची ही मजेदार पद्धत आहे, जी खूपच मनोरंजक आहे. ग्राहकांना आईस्क्रीम डिलिव्हर करण्यासाठी विक्रेते अनेकदा लांब दांडी वापरून ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. विक्रेता आणि ग्राहक काही काळ खेळतात आणि नंतर आईस्क्रीम दिली जाते.
आईस्क्रीम सर्व्ह करण्याचा ही व्हायरल आणि मनोरंजक पद्धतीचा एक व्हिडीओ झोमॅटोने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही हसू आवरू शकणार नाही. या व्हिडीओमध्ये झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय डिलिव्हरीसाठी आलेला दिसत आहे. एका व्यक्तीने तुर्की आईस्क्रीम ऑर्डर केली होती. ती डिलिव्हरी देत असताना डिलिव्हरी बॉयने ज्या पद्धतीने ही आईस्क्रीम दिली, ती पाहून तुम्हाला आणखी मजा येईल.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : दारूसाठी कायपण! रस्त्यावर उलटला ट्रक, तर लहान मुलं सुद्धा बाटल्या घेऊन पळाले
खरं तर आइस्क्रीम सर्व्ह करण्याची ही तुर्की पद्धत आहे. या पद्धतीचा अवलंब करून या डिलिव्हरी बॉयने आधी त्या व्यक्तीला फसवले आणि नंतर आईस्क्रीमऐवजी रिकामा बॉक्स दिला. त्या व्यक्तीने बॉक्स उघडताच त्याचे डोळे विस्फारले. रिकामा बॉक्स पाहून त्याने त्याच्या आईस्क्रीमबद्दल विचारले तेव्हा डिलिव्हरी बॉयने त्याच्या हातात असलेला बॉक्स दाखवला. आपल्या आवडत्या आईस्क्रीमची वाट पाहणाऱ्या ग्राहकाला ते मिळणे किती कठीण झाले असेल, याचा अंदाज व्हिडीओ पाहून लावता येईल.
आणखी वाचा : थेट ट्रॅक्टरवर बसून नवरीने लग्नात केली धांसू एन्ट्री, आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : अपने गली में कुत्ता शेर! कुत्र्याचा थेट जंगलाचा राजा सिंहावरच हल्ला, पाहा हा VIRAL VIDEO
हा मजेदार व्हिडीओ Zomato च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्यात लिहिले आहे की, ‘स्वतःच्या जबाबदारीवर प्रयत्न करा’. या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर आतापर्यंत ११ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका इन्स्टाग्राम युजर्सने कमेंट करताना लिहिले, ‘कल्पना करा की पैसे देताना मी असेच केले असते तर.’ दुसऱ्याने कमेंट करून लिहिले, ‘तुम्ही सुपर क्रिएटिव्ह आहात.’ तर एकाने मजेशीर कमेंट करताना लिहिले की, ‘माझी आई हा रिकामा बॉक्स सुद्धा ठेवेल.’