सोशल मीडियावर आज काल प्राण्यांचे अनेक प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी मानवी वस्तीत शिरलेला बिबिट्या, तर कधी प्राण्यांची शिकार करणारे हिंस्र प्राणी, कधी जंगल सफारी करताना वाहनाच्या समोर येणारे प्राणी…. असे व्हिडीओ आपण रोजच पाहतो. या व्हिडीओमध्ये काही मोजकेच व्हिडीओ असे असतात ज्यामध्ये वन्य प्राणी आणि मानव यांच्यामध्ये फार क्वचित मैत्रीपूर्ण संबध दिसतात. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये रात्रीच्या अंधारात जंगालातून जाणाऱ्या दुचाकी चालकाच्या समोर अचानक सिंह येतो पण तो त्याला काहीही नुकसान न पोहचवता शांतपणे निघून जातो. वन्य प्राणी आणि मानव यांच्या सहअस्तित्वावर प्रकाश टाकणारा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वन्य प्राणी आणि मानव यांच्यामधील शौर्य आणि मैत्रीपूर्ण नात्याची झलक दाखवणारा प्राणीसंग्रहायलयातील एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये प्राणिसंग्रहालयाचे रक्षक हे थेट सिंहाबरोबर रस्सीखेच खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. इंस्टाग्रामवर jayprehistoricpets नावाच्या अकांऊटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, सिंह आणि मानव यांच्यातील ही धाडसी चकमक पाहून लोक अवाक् झाले आहेत.

Tiger effortlessly jumps across the river with a single leap Tiger Crossing River By Jump Animal Video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
silver button of YouTube in the hand of a monkey
आईशप्पथ, चक्क माकडाच्या हातात यूट्यूबचे सिल्व्हर बटण… VIDEO पाहून नेटकरीही झाले शॉक!
Dog Viral Video
‘सांगा, हे योग्य की अयोग्य?’ चक्क श्वानाच्या अंगावर लावली लायटिंग… VIDEO पाहून व्हाल अवाक्
Leopard's tactics for monkey hunting
युक्तीने साधला डाव! माकडाच्या शिकारीसाठी बिबट्याचा डावपेच; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
black hole triple system
शास्त्रज्ञांनी लावला पहिल्या ‘ब्लॅक होल ट्रिपल’चा शोध; यातून नेमकं काय उलगडणार?
pistol use to burst crackers, pistol crackers Vadgaon bridge area, pistol use to burst crackers,
दिवाळीतील टिकल्या वाजविण्याच्या पिस्तुलाचा धाक, बाह्यवळण मार्गावर दहशत माजविणारे दोघे जण ताब्यात
Shocking video of CRPF Jawan Catches Wife Trying To Elope, Thrashes Her Lover In Front Of Crowd At Patna Station
झालं का फिरुन? सीआरपीएफ जवानाने बायकोला बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं; VIDEO पाहून बसेल धक्का

हेही वाचा – चक्क सोंडेने चित्र काढतोय हा हत्ती! निसर्गाचे सुंदर चित्र पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, Video Viral

जे ब्रेव्हर (Jay Brewer) हे प्राणिसंग्रहालयाचे रक्षक आहेत. जंगलाचा राजा असलेल्या सिंहाला प्राणीसंग्रहालयातील एका पिंजऱ्यामध्ये ठेवले आहे. पिंजाऱ्यातून आत एक मोठा दोरखंड जाईल अशी जागा ठेवली आहे. एकीकडे पिंजाऱ्याच्या आत सोडलेला हा दोरखंडाचे टोक सिंहाने तोंडामध्ये पकडला आहे. तर दुसरीकडे पिंजाऱ्याच्या बाहेर असलेल्या दोरखंडाचे दुसरे टोक प्राणिसंग्रहालयाचे रक्षक असलेल्या ब्रेव्हर यांनी हातात पकडले आहे. दोघांमध्ये रंजक आणि उत्साही सामना रंगला आहे. ब्रेव्हर त्यांची संपूर्ण ताकद वापरून दोरखंड ओढत आहेत. सिंह तोंडामध्ये दोरखंड पकडून संपूर्ण ताकद पणाला लावतो आहे. काही क्षण ही रस्सीखेच अशीच सुरु राहते. कोण हरणार कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांना असते. पण तेवढ्यात सिंह जोरदार हिसका देत दोरखंड स्वत:कडे ओढतो त्याबरोबर प्राणीसंग्रहायलाचे रक्षक दोरखंडासह पुढे सरकतात. पुढच्या क्षणी ते हातातील दोरखंड सोडून देतात आणि आपली हार स्विकार करतात.

हेही वाचा – रेस्टॉरंटमध्ये Apple Vision Pro headset वापरून व्यक्ती Virtual Dateचा घेत होता आनंद! फोटो होतोय व्हायरल

व्हायरल व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये ब्रेव्हरने लिहिले की, “मी घेतलेल्या सर्व प्रशिक्षणासह मी त्याला हरवू शकेल असे वाटले होते परंतु तरीही मी या सुंदर प्राण्याला मात देऊ शकलो नाही..” त्याचे शब्द सिंहाच्या सामर्थ्याबद्दल प्रशंसा करत आहे.

हेही वाचा – रात्रीच्या अंधारात जंगलात दुचाकीस्वाराच्या समोर आला सिंह अन्……; पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा

माणूस आणि हिंस्र पशू यांच्यातील हृदयस्पर्शी सामना पाहून नेटकरी मंत्रमुग्ध झाले आहेत. हा व्हिडीओ ३,०३,००० पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की,”व्वा ते इतके बलवान आहेत” तर दुसऱ्याने लिहिले की, “सिंह खूप निवांतपणे खेळत आहे आणि घाम फुटला नाही..तुम्हाला चांगले प्रयत्न करण्याची गरज आहे जे.”