राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक कमी झाल्यानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर महाराष्ट्र सरकारने अनलॉकची घोषणा करणारा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार अनलॉकसाठी करोना पॉझिटिव्ही रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची स्थिती यावरून ‘अनलॉक’चे पाच गट तयार करण्यात आले आहेत. ७ जूनपासून हे आदेश लागू होणार असले तरी या आदेशांमधील आकडेमोड आणि निकषांमुळे संभ्रमावस्था निर्माण झालीय. मात्र पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे काय आणि तो कसा मोजतात याबद्दल अनेकांना संभ्रम आहे. आज जारी करण्यात आलेल्या नव्या नियमांमुळे पॉझिटिव्ही रेट हा सर्वसमान्यांवर थेट परिणाम करणार आहे, कारण यावरच आता एखाद्या जिल्ह्यातील, शहरातील निर्बंध काय असतील हे ठरणार आहे. म्हणूनच पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे काय आणि तो कसा मोजतात हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
नक्की वाचा >> Maharashtra Unlock: लग्नसमारंभ, हॉटेल, मॉल, प्रायव्हेट ऑफिसेस… कुठे काय सुरु काय बंद जाणून घ्या
पॉझिटिव्ही रेट म्हणजे काय?
पॉझिटिव्ही रेटला टीपीआर असं म्हणतात. टीपीआरचा फूलफॉर्म टोटल पॉझिटीव्हीटी रेट असा आहे. एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये करण्यात आलेल्या एकूण करोना चाचण्यांपैकी किती जणांच्या करोना चाचण्यांचा निकाल पॉझिटिव्ह आलाय याची टक्केवारी म्हणजे टीपीआर. पॉझिटिव्ही रेट काढण्याचं सूत्र अगदी साधं आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्येने एकूण केलेल्या चाचण्यांच्या संख्येने भागल्यास जो आकडा येईल त्याला १०० ने गुणावे. या आकडेमोडीनंतर येणाऱ्या उत्तराला त्याला पॉझिटिव्ही रेट असं म्हणतात.
नक्की वाचा >> Maharashtra unlock : तुमचा जिल्हा कोणत्या गटात; काय असतील निर्बंध?
पॉझिटिव्ही रेटचं गणित मांडताना एकूण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सर्व चाचण्यांचा विचार केला जातो. त्यामुळे एखाद्या ठिकाणाच्या संसर्गाचा अंदाज केलेल्या चाचण्यांच्या प्रमाणात मांडता येतो. जागतिक आरोग्य संघटनेने २०२० साली मे महिन्यात दिलेल्या नियमांनुसार पॉझिटिव्हिटी रेट काढण्यात येतो. एखाद्या परिसरामध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्या भागामधील करोना संसर्ग नियंत्रणात आहे असं मानलं जातं.
नक्की वाचा >> Explained: संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?
पॉझिटिव्हिटी रेट महत्वाचा का आहे?
एखाद्या विशिष्ट भागामध्ये करोनाचा प्रादुर्भाव होतोय की मंदावलाय हे जाणून घेण्यासाठी पॉझिटिव्हिटी रेटचा फायदा होतो. उदाहरणार्थ जर भारताचा करोना पॉझिटिव्हिटी रेट हा २० वरुन १८ वर आला तर करोनाचा संसर्ग कमी प्रमाणात होतोय असं म्हणता येईल. म्हणूनच करोनासंदर्भातील नियम किती शिथिल करावेत हे ठरवण्यासाठी पॉझिटिव्हिटी रेटचा वापर केला जातो. पॉझिटिव्हिटी रेटमुळे एखाद्या परिसरामध्ये एकूण चाचण्या केलेल्यांपैकी किती जण पॉझिटिव्ह आलेत हे टक्केवारीच्या प्रमाणात ठरवता येते. कमी पॉझिटिव्हिटी रेट हा सकारात्मक संकेत समजला जातो. पॉझिटिव्हिटी रेट कमी असल्यास संसर्गचे प्रमाण कमी झाले असून त्या परिसरामध्ये थोडी मोकळीत देता येण्याच्या शक्यता प्रशासनाला पडताळून पाहता येतात.
नक्की वाचा >> समजून घ्या : Long Covid म्हणजे काय आणि त्यावर कशी मात करता येते?
नक्की वाचा >> ‘साइटोकिन स्टोम’ म्हणजे काय?; तरुण रुग्णांचा मृत्यू होण्यासाठी हाच फॅक्टर कारणीभूत असतो का?
जास्त पॉझिटिव्हिटी रेटचा अर्थ काय?
या उलट पॉझिटिव्हिटी रेट अधिक असेल तर मोठ्या प्रमाणात करोना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. अशा ठिकाणी कठोर निर्बंध लादून कमीत कमी लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येतील किंवा घराबाहेर पडतील यासंदर्भातील दक्षता घेतली जाते. पॉझिटिव्हिटी रेट अधिक असणाऱ्या भागांमध्ये करोनाचा धोका हा सर्वाधिक असतो. म्हणूनच असा प्रदेशांमध्ये कठोर निर्बंध, लॉकडाउन लागू करण्याला प्रशासन प्राधान्य देतं. जिथे पॉझिटिव्हिटी रेट अधिक असेल तिथे दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढवणे गरजेचे असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण असतील तर त्याचं निदान होऊन त्यांच्यावर उपचार करता येतात.