‘आपला हात जगन्नाथ’ हा वाक्प्रचार आपण ज्या भावनेने प्रत्यक्षात वापरतो त्याच्यापेक्षा भन्नाट अर्थाने तो आपल्याला ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात भेटतो. आणि तुमची तयारी असो वा नसो, त्या संदर्भासहित तो तुम्हाला पटलेलाही असतो. गेल्या अनेक वर्षांत स्त्रियांच्या लैंगिक गरजा या नैतिकतेच्या बुरख्याखाली लपलेल्या होत्या. त्या वास्तवात मान्य करणे अजूनही तितके सहजसोपे झालेले नाही. त्यामुळे रुपेरी पडद्यावर आता त्यांना जेव्हा कंठ फुटतो आहे तेव्हा तो बोल्डनेस भारी वाटतो. चार मैत्रिणींची कथा सांगणारा हा चित्रपट त्यांच्या खऱ्या भावना रंगवण्याइतपत बोल्ड नक्कीच आहे. मात्र तो अजून सुंदर असायला हवा होता ही रुखरुख वाटते..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘वीरे दी वेडिंग’चे ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटावर ‘सेक्स अ‍ॅण्ड सिटी’चा प्रभाव आहे हे जाणवत होते. तसा तो मूळ संकल्पनेवर आहेही. पण आपल्या बॉलीवुडी धाटणीप्रमाणे तो देसी उच्च मध्यमवर्गीय खास करून दिल्लीच्या गल्ल्यांमधून रुळलेल्या श्रीमंती वातावरणात घडतो. त्यामुळे काही समीकरणे कथेत पक्की आहेत. कालिंदी (करीना कपूर), अवनी (सोनम कपूर), साक्षी (स्वरा भास्कर) आणि मीरा (शिखा तलसानिया) या चारही शाळेपासूनच्या मैत्रिणी.. अर्थात श्रीमंतीत वाढलेल्या. त्यांच्यासाठी प्रत्येकाच्या आई-वडिलांनी काही ना काही ठरवून दिलेले पुढचे मार्ग आहेत, जे फक्त स्वीकारायचे की नाहीत एवढेच त्यांच्यावर अवलंबून आहे. तर या चौघी जीवश्चकंठश्च मैत्रिणी उच्च शिक्षणाच्या निमित्ताने वेगळ्या होतात आणि काही सेकंदांतच दहा वर्षांनी त्या आपल्याला पुन्हा एकत्र येताना दिसतात. निमित्त कालिंदीच्या लग्नाचे.. इथे व्यक्तिरेखांच्या बाबतीतले दुसरे पक्के समीकरण आपल्याला पाहायला मिळते, ते कालिंदीच्या रुपाने. ती हुशार, प्रेमळ, सुंदर सर्वगुणी आहे आणि तरीही लग्नाच्या निर्णयाबाबत गोंधळलेली आहे. मिळून चौघी जणी ‘पार्टी हार्ड’ करणाऱ्या या प्रत्येकीचे आपले एक दु:ख आहे. या चौघींच्या एकत्र येण्यातून जुने गुंते सुटत जातात, नवी उभारी मिळते, हुकणारे क्षण पुन्हा गवसतात.. थोडक्यात सगळ्यांचे आयुष्य रुळावर येते, ही सर्वसाधारण कथा आहे.

शशांक घोष दिग्दर्शित या चित्रपटातील कलाकारांची निवड आणि व्यक्तिरेखा या नेहमीच्या पठडीतील नाहीत. त्यामुळे चित्रपटात एक ताजेपणा जाणवतो. कालिंदीचे आई-वडील, समलिंगी काका किंवा तिचा प्रियकर ऋषभचे (सुमित व्यास) टिपिकल दिल्लीवाले आईबाबा, सोनम कपूरच्या आईच्या भूमिकेत नीना गुप्ता असे अनेक कलाकार आणि अजब व्यक्तिरेखांचा अफलातून मेळ या चित्रपटात पाहायला मिळतो. खुद्द चार प्रमुख नायिकांमध्येही सतत दारू पिणारी, शिव्या घालणारी साक्षी म्हणून स्वरा भास्करचा बोल्ड अवतार तर एरवी धिटाईने वागणाऱ्या सोनमला वरवर साधीभोळी दिसणाऱ्या आतून लैंगिक संबंधांसाठी आसुसलेल्या अवनीच्या भूमिकेत पाहणे हा वेगळा अनुभव आहे. मात्र या सगळ्यांची मोट बांधताना एका उत्तम कथेची गरज होती जी या चित्रपटात नाही. ठोकताळ्यांवर बसवलेला हा चित्रपट त्याच फिल्मी मार्गाने या चौघींच्या तथाकथित समस्या दूर करताना दिसतो. चौघींचे मैत्रिणी म्हणून एकमेकींशी असलेले घट्ट नातेही एका मर्यादेपलीकडे जात नाही. स्त्रीवादाशी या चित्रपटाचा दूरदूरचा संबंध नाही. मात्र या मुलींना जे वाटते, योग्य किंवा अयोग्य, मग ते कुटुंबातील नातेसंबंधांबद्दल असो किंवा लैंगिक संबंधांबद्दल, त्या ते स्पष्टपणे बोलतात, आपले निर्णय स्वत: घेतात, चुकांमधून शिकतात, त्या निर्णयातून येणाऱ्या परिणामांची जबाबदारीही घेतात. त्यांचे हे स्वतंत्र असणे आणि तसे वावरणे हीच या चित्रपटाचा जमेची बाजू ठरली आहे. त्याला चुरचुरीत संवाद आणि अभिनयाची जोडही मिळाली आहे. त्यामुळे फार प्रभावी किंवा खोलात जाणारा नसला तरी असे चित्रपट येणे आणि ते पाहिले जाणे ही आजची गरज आहे. खोटी स्वप्ने विकणाऱ्या तद्दन मसाला चित्रपटांच्या गर्दीत ‘वीरे दी वेडिंग’सारखे चित्रपट मोकळा श्वास देतात हेही तितकेच खरे!

वीरे दी वेडिंग

  • दिग्दर्शक – शशांक घोष
  • कलाकार – करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर, शिखा तलसानिया, सुमित व्यास, नीना गुप्ता, एकावल्ली खन्ना, विवेक मुश्रन, अंजुम राजाबाली.