‘ठगास ठग’ या न्यायाने जेव्हा तीन-चार अक्कलबाज डोकी एकत्र येतात तेव्हा कुणाची ना कुणाची तरी सरशी होणार आणि दुसरा डुबणार हे समीकरण निश्चित असते. मात्र हे करताना ठगांची ही टोळी एकमेकांनाच शह-काटशह देण्याच्या प्रयत्नात काय करामती करते, यात शिरजोर ठरणारा माणूस नेमकी काय खेळी खेळतो.. हे बघणे निश्चितच औत्सुक्याचा भाग असतो. असे चित्रपट जे ‘कॉन’ फिल्म्स म्हणून ओळखले जातात त्याचा टक्का हिंदीत अंमळ जास्त आहे. मराठीत मात्र असे चित्रपट शोधावेच लागतात. या पाश्र्वभूमीवर प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘मस्का’ हा खरोखरच मनोरंजनाचा तडका देणारा चित्रपट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कॉन फिल्म्समध्येही अनेकदा फसवाफसवी करणारा हा नायकच असतो. इथे त्रिकूट आहे आणि त्यांचा सगळा भार हा नायिकेवर आहे. त्यामुळे त्याची मांडणी पाहिल्यानंतर हिंदीतील सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘डॉली की डोली’ चित्रपटाची चटकन आठवण येते, पण त्याचा आणि या चित्रपटाचा दूरदूरचा संबंध नाही हेही तितकेच खरे. कारण यात फसवेगिरी आहेच, पण ती अवास्तव किंवा उगीचच इथून-तिथून प्रसंग जोडून केलेली नाही. कोणाच्या तरी भावनांशी खेळ करत आपला ‘अर्थ’ काढून घेणाऱ्या तिघांची कथा या चित्रपटात पाहायला मिळते. माया (प्रार्थना), यादव (शशांक शेंडे) आणि चिकू (प्रणव रावराणे) या तिघांचे एक जग आहे. या तिघांचेही आयुष्य एकमेकांशी ‘अर्था’अर्थी बांधले गेले आहे. एकेक खेळ रचत पुढे जाणाऱ्या या मंडळींच्या खेळात हर्षच्या (अनिकेत विश्वासराव) रूपाने आणखी एक चौथा गडी दाखल होतो. साहजिकच हर्ष हे त्यांच्या खेळातील नवीन प्यादे आहे, मात्र हा खेळ त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्याच पद्धतीने रंगू लागतो. यात पाचवा गडी परदेशी (चिन्मय मांडलेकर) हाही कथेत शिरतो आणि मग एकमेकांना फसवण्याच्या किंवा धडा शिकवण्याच्या नादात लोणी कोणाच्या हाती लागते त्याची ही धमाल कथा आहे.

प्रियदर्शनला अभिनेता म्हणून आपण अशा हुकमी विनोदी भूमिकांमधून पाहिले आहे, पण तितक्याच तगडय़ा कलाकारांना नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकांच्या साच्यात बसवून त्याला कॉनपटांची फोडणी देण्याच्या पहिल्याच प्रयत्नात तो दिग्दर्शक म्हणून यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाची खरी गंमत त्याच्या कथेपेक्षाही व्यक्तिरेखांच्या मांडणीत आहे. प्रार्थना बेहरेला नेहमीच्या साचेबद्ध नायिकांपेक्षा वेगळी भूमिका मिळाली असून तिने अगदी सहजपणे ही भूमिका रंगवली आहे. केवळ एकेक व्यक्तिरेखा नव्हे, तर या चित्रपटात नायक म्हणून तिच्याबरोबर रंगलेल्या जोडय़ाही पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या आहेत. शशांक शेंडे आणि चिन्मय मांडलेकर दोघांनी आजवर ते ज्या सोज्वळ, सालस भूमिकांमधून वावरले आहेत त्याच्याबरोबर विरुद्ध भूमिका तीही चपखलपणे साकारली आहे. अनिकेतलाही चांगली भूमिका मिळाली आहे, पण अगदी चोख मराठी बोलणारा हर्ष वर्मा थोडासा खटकतो. विद्याधर जोशी, प्रणय रावराणे असे चित्रपटातील एकूण एक कलाकार त्या त्या व्यक्तिरेखांमध्ये फिट बसले असून त्यांच्यातील जुगलबंदी अफलातून रंगली आहे. अशा कथांना जो वेग हवा असतो तसा वेग आणि शेवटपर्यंत उत्कंठा वाढवत नेणारी मांडणी यामुळे मनोरंजनाचा हा मस्का चांगलाच रंगला आहे आणि हा मस्का एवढय़ावरच थांबेल असेही नाही.. ही गुगली अर्थात चित्रपट पाहिल्याशिवाय कळणार नाही.

मस्का

  • दिग्दर्शन – प्रियदर्शन जाधव
  • कलाकार – प्रार्थना बेहरे, शशांक शेंडे, प्रणय रावराणे, अनिकेत विश्वासराव, चिन्मय मांडलेकर, विद्याधर जोशी