अभिनेता आमिर खानची बॉलिवूडमध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळख आहे. निवडक चित्रपटांचीच निवड करणा-या आमिरचा आतापर्यंत प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरलेला आहे. आमिर उत्तम अभिनेत्याबरोबरच एक सजग नागरिक असल्याचेही अनेक वेळा पहायला मिळते. दुष्काळग्रस्त गावांना जलमय करण्यासाठी आमिरने पाणी फाउंडेशनच्या मदतीने समाजकार्यात आपले योगदान दिले. मात्र हाच समाजकार्य करणारा आमिर सध्या एका कारणामुळे ट्रोल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आमिर सध्या आपल्या कुटुंबियांबरोबर सुट्टीची मज्जा घेत असून त्याने फेसबुकवर कुटुंबासमवेतचे काही फोटो शेअर केले आहेत. याच फोटोंपैकी एका फोटोमुळे त्याच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. आमिरने मुलगी इरा खान हिच्याबरोबर एक फोटो शेअर केला असून हा फोटो आमिरच्या चाहत्यांना आवडला नसल्याचे दिसून आले.

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये आमिर आपल्या मुलीबरोबर मस्ती करताना दिसून येत आहे. मात्र काही ट्रोलक-यांनी या फोटोवर आक्षेप घेत आमिरला खडे बोल सुनावले आहेत. काही नेटक-यांनी तर मुलगी आणि वडील यांच्या नात्यावर आक्षेप घेतला आहे. मात्र नेटक-यांच्या या टिकांमधून पुन्हा एकदा हीन दर्जाची मानसिकता दिसून आली आहे. देश कितीही प्रगत झाला तरी तेथे राहणा-या नागरिकांची विचारसरणी बदलण्याची गरज असल्याचे या यावेळी दिसून आले.

दरम्यान, काही ट्रोलक-यांनी आमिरला रमजानचा महिना असल्यामुळे मुलीला व्यवस्थित कपडे घालण्याचा सल्लाही दिला आहे. तर काही ट्रोलक-यांनी वडीलांचं नातं समजून थोडी लाज बाळग, असेही म्हटले आहे. मात्र आमिरने या ट्रोलक-यांना कोणतेही उत्तर दिले नसून तो कोणती भूमिका घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.