‘अग्निपथ’च्या रिमेकमध्ये त्याने आपल्या शैलीनुसार कांचा चीना (डॅनी) साकारला.
‘जंजीर’च्या रिमेकमध्ये तो ‘शेर खान’ (प्राण) साकारतोय.
याच ‘चार्ली’नुसार त्याला आणखी काही भूमिका साकारायला मिळतील..
‘मिस्टर इंडिया’ची रिमेक अथवा पुढचा भाग निर्माण करताना त्याला ‘मोगॅम्बो’ला अधिकाधिक अक्राळविक्राळ करता येईल. ‘शान’चा शाकाल (कुलभूषण खरबंदा), ‘कर्मा’चा डॉ. डेंग (अनुपम खेर) ‘सडक’ची महारानी (सदाशिव अमरापूरकर) इतकेच नव्हे तर पुन्हा कोणाला तरी ‘शोले’ची रिमेक करण्याची हुक्की आलीच तर नव्या दमाचा, नव्या शैलीचा गब्बरसिंगदेखील (अमजद खान) तो साकारू शकतो.
एखाद्या कलाकाराचे असेही वेगळेपण असू शकते.
संजय दत्तला असे वैशिष्टय़ जमेल नि शोभेलही. ऐवीतेवी रिमेक अर्थात पुनर्निर्मिती व सिक्वेल अर्थात पुढचा भाग यांचे दिवस आहेत. त्यात एकेकाळच्या बहुचर्चित भूमिका एकाच कलाकाराला साकारण्याचा योग आलाच, तर त्याचे स्वागत करूया. ते सोपे आहे की अवघड हे एकेक चित्रपट पाहिल्यावर ठरवता येईलही.