बारावीच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार अंतर्गत मूल्यमापनाचे २० टक्के गुण संबंधित शाळांच्या हाती दिल्याचा परिणाम म्हणून यंदा बारावीच्या परीक्षेत राज्यात तब्बल ९०.०३ टक्के विद्यार्थी
यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. यंदा राज्यभरातून ११ लाख ९८ हजार ८५९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यातील १० लाख ७९ हजार ३३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ५ लाख १००० विद्यार्थिनी असून, परीक्षेला बसलेल्या मुलींपैकी ९३.५० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर उत्तीर्ण झालेल्या मुलांची संख्या ८७.२३ टक्के आहे. राज्य मंडळाच्या नऊ विभागांमध्ये यंदा कोकण विभागाने आघाडी घेतली असून, या विभागाचा निकाल ९४.८५ टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (८८.३० टक्के) लागला. निकालाचा टक्का वाढल्याने महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीचा पेच निर्माण होणार आहे. काही महाविद्यालयांमध्ये तर कनिष्ठ महाविद्यालयांच्या तुलनेत पदवीच्या जागा कमी असल्याने त्त्याच महाविद्यालतील बारावीच्या विद्यार्थ्यांना सामावून घेतानाच नाकीनऊ येणार आहे. दरवर्षी बारावीला काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने महाविद्यालयांना पदवीकरिता बाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जागा उपलब्ध करून देता येतात. परंतु, यंदा बारावी निकालाचा टक्का सर्वच शाखांमध्ये चांगलाच वधारल्याने पदवीच्या प्रवेशांसाठीची चुरस अटीतटीची असेल. काही महाविद्यालयांना तर यंदा बाहेरच्या विद्यार्थ्यांकरिता जागा उपलब्ध करून देणेही शक्य होणार नाही.
आता प्रवेशाचा पेच.. ; बारावीच्या निकालाचा उच्चांक
बारावीच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार अंतर्गत मूल्यमापनाचे २० टक्के गुण संबंधित शाळांच्या हाती दिल्याचा परिणाम म्हणून यंदा बारावीच्या परीक्षेत राज्यात तब्बल ९०.०३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-06-2014 at 02:28 IST
Web Title: After hsc result declared next battle for college admission