मे महिन्याच्या अतिथी विश्लेषक आहेत प्राची अशोक जोशी. त्यांनी पुणे विद्यापीठातून धातूशास्त्र या विषयात बीईची पदवी घेतल्यावर काही काळ पुणे येथील टाटा मोटर्सच्या कारखान्यात अनुभव घेतला. त्या एक्सएलआरआय जमशेदपूर या संस्थेतून एमबीए झाल्या असून, त्या जेपी मॉर्गनच्या अॅसेट मॅनेजमेंट (एशिया) सिंगापूर येथे समभाग विश्लेषक होत्या. जेपी मॉर्गनमध्ये रुजू होण्यापूर्वी त्या एसबीआय म्युच्युअल फंड व आदित्य बिर्ला प्रायव्हेट इक्विटीमध्ये समभाग संशोधक म्हणून कार्यरत होत्या. ज्या कंपन्यांची उत्पादने औद्योगिक वापरासाठी (Industrial Use) आहेत अशा समभागांचा माग ही त्यांच्या एकूण नऊ वर्षांच्या समभाग संशोधन अनुभवाची खासियत आहे.
एआयए इंजिनीअिरग(बीएसई कोड – ५३२६८३)
” ७२८
वार्षिक उच्चांक/नीचांक : “७२०/२७५
दर्शनी मूल्य: ” २ पी/ई: २३.५१ पट
मूल्यांकन : कंपनीच्या महसुलाचा २० टक्के वाटा हा खाण उद्योगातून येतो. मागील दोन वर्षांपासून जारी असलेले सर्वोच्च न्यायालयाचे र्निबध हळूहळू सल करण्यात येत आहेत. मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने आपल्या देखरेखीखाली मर्यादित खोलीपर्यंत खनन करण्यास परवानगी दिली आहे. पुढील तीन ते चार वर्षांत कंपनीची विक्री १६-२० टक्के दराने वाढण्याची आशा आहे. विक्री मुख्यत्त्वे ग्राहकांकडून मागणी वाढल्यामुळे (व्हॉल्यूम ग्रोथ) होईल. कंपनीचा व्याज घसारा करपूर्व नफा २२-२४ टक्के दरम्यान असेल. देशातील ऊर्जेची बिकट अवस्था पाहता नव्या सरकारकडून कोळसा खाणी विकसित करून उत्पादन वाढविल्यास कोल इंडियासहित इतर खाण मालकांवर दबाव असेल. या धोरणाचा प्रत्यक्ष लाभार्थी एआयए इंजिनीअरिंग ठरणार आहे. या विस्तारानंतर कंपनीवरील कर्जाचे प्रमाण मर्यादेत राहणार आहे. सध्याच्या किमतीचे २०१४ च्या उत्सार्जनाशी प्रमाण २४.५ पट तर २०१५ च्या उत्सार्जनाशी १७ पट तर २०१६ शी १३ पट आहे. २०१७ च्या उत्सार्जनाशी ९ पट आहे. म्हणूनच शुक्रवारी वार्षकि उच्चांकाची नोंद केलेल्या या समभागात तीन ते पाच वष्रे मुदतीच्या गुंतवणूक केल्यास वार्षकि ३०-३५ टक्के दराने भांडवली नफा मिळू शकेल.
एआयए इंजिनीअिरग या कंपनीची स्थापना १९७९ मध्ये अहमदाबाद येथे झाली. ही कंपनी सिमेंट, रासायनिक खते, ऊर्जा निर्मिती व अन्य सामान्य अभियांत्रिकी उद्योगासाठीचे वेगवेगळे प्रकल्प हाताळते. ही कंपनी आपल्या वेगवेगळ्या उद्योगातील ग्राहकांसाठी प्रकल्पांचे आरेखन, निर्मिती व उभारणी या व्यवसायात आहे. या प्रकल्पांमध्ये ऊर्जा प्रकल्पासाठी ‘कोल हँडिलग सिस्टीम’, ‘अॅश हँडलिंग सिस्टीम’, ‘वॅगन टिल्टलर’, मायिनग उद्योगासाठी ‘बल्क हँडिलग सिस्टीम’ विमानतळावर प्रवाशांचे सामान हाताळणारी ‘बॅगेज कन्व्हेयर बेल्ट’, सिमेंट व औष्णिक उर्जा प्रकल्पांसाठी क्रशर आदी कंपन्यांची प्रमुख उत्पादने आहेत. ‘हाय कार्बन हाय क्रोमियम स्टील’ या उच्च दर्जाच्या पोलादाचे ओतकाम (कािस्टग) करण्याची जगातील दुसरी व आशियातील सर्वोच्च क्षमता या कंपनीकडे आहे. उत्पादने, सिमेंट कारखाने, ऊर्जा निर्मिती यातील पोलाद निर्मिती (कोल्ड रोिलग मिल्स) यातील रोल्स ही पद्धत वापरून तयार होतात. एसीसी, गुजरात अंबुजा सिमेंट, लाफार्ज, अल्ट्राटेक हे सिमेंट उत्पादक एनटीपीसी, अदानी पोर्ट, टाटा मोटर्स, टाटा स्टील, िहदुस्थान िझक, भारत अॅल्युमिनियम, भारतीय विमानतळ प्राधिकरण, लार्सन अॅण्ड टुब्रो, भारतीय रेल्वे ही या कंपनीचे काही प्रतिष्ठित ग्राहक आहेत. कंपनी यंत्रसामुग्री उत्पादक (ओईएम) व दुरुस्ती या दोन्ही बाजारपेठेत आपले स्थान राखून आहे. वेगवेगळ्या उद्योगांतील सध्याची ‘हाय कार्बन हाय क्रोमियम’ रोलरल्सची जागतिक मागणी वार्षकि सहा लाख टन आहे. यातील ८० टक्के पुरवठा या कंपनीकडून होतो.
३१ मार्च २०१३ ला संपलेल्या आíथक वर्षांत कंपनीची रोलर उत्पादन क्षमता २ लाख मेट्रिक टन होती. कंपनीने आपली स्थापित क्षमता दोन टप्प्यांत ४.४० लाख मेट्रिक टन वाढविण्याचे ठरविले आहे. सध्या जगात दुसऱ्या क्रमांकाची स्थापित क्षमता असलेली ही कंपनी या विस्तारानंतर जगातील पहिल्या क्रमांकाची रोलर उत्पादक होईल. बेल्जियम देशातील मॅगोटेक्स या कंपनीची उत्पादन क्षमता ३ लाख मेट्रिक टन असून सध्या ‘हाय कार्बन हाय क्रोमियम स्टील रोलर’मधील सर्वाधिक उत्पादन क्षमता असलेली ही कंपनी आहे. हा विस्तार कार्यक्रम मार्च २०१६ पर्यंत पूर्ण होऊन शंभर टक्के क्षमतेने उत्पादन करू शकेल, अशी शक्यता व्यवस्थापनाने आíथक वर्ष २०१४ चे वार्षकि निकाल जाहीर करताना झालेल्या विश्लेषकांशी साधलेल्या संवादात केली आहे. कंपनीच्या वेलकास्ट स्टील्स (७५% मालकी) व डीसीपीएल फौंड्रीज (१००% मालकी) असलेल्या उपकंपन्या आहेत. वेलकास्ट स्टील्स ही कंपनी सिमेंट उत्पादकासाठी चुनखडी तर औष्णिक ऊर्जा उत्पादकांसाठी कोळसा दळण्याची यंत्रे (क्रशर) तयार करते. तर कंपनीच्या वेगा इंडस्ट्रीज (दुबई), वेगा इंडस्ट्रीज (यूएसए) वेगा इंडस्ट्रीज (यूके), वेगा इंडस्ट्रीज (रशिया) व वेगा इंडस्ट्रीज (चीन) या त्या त्या भौगोलिक क्षेत्रासाठी उपकंपन्या आहेत.
‘अर्थ वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध लेखांमध्ये चर्चिलेल्या समभागांमध्ये लेखकांची व्यक्तिगत गुंतवणूक अथवा अन्य स्वारस्य नाही. परंतु सदर लेखकांचा सल्ला घेणारे ग्राहक, निकटवर्तीयांची त्यात गुंतवणूक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अतिथी विश्लेषक
मे महिन्याच्या अतिथी विश्लेषक आहेत प्राची अशोक जोशी. त्यांनी पुणे विद्यापीठातून धातूशास्त्र या विषयात बीईची पदवी घेतल्यावर काही काळ पुणे येथील टाटा मोटर्सच्या कारखान्यात अनुभव घेतला.
First published on: 26-05-2014 at 01:02 IST
Web Title: Aia engineering