शाहरुख खान विरुद्ध अजय देवगण यांच्यात ‘पहिला सामना’ कधी रंगला माहित्येय?
राकेश रोशनने ‘करण अर्जुन’साठी त्या दोघांना एकत्र आणले होते. राजकमल स्टुडिओत चित्रीकरणही सुरू झाले नि कशावरून तरी अजयने
चित्रपट सोडला व त्याच्या जागी सलमान खान आला..
शाहरुखच्या आत्मकेंद्रित वागण्याला कंटाळून अजयने चित्रपट सोडल्याच्या कंडय़ा तेव्हा पिकल्या.
त्या दिवसात काजोल शाहरुखची छान मैत्रीण होती. (तत्पूर्वी ‘बाजीगर’मध्ये ते एकत्र होते) अजय देवगनची एव्हाना ती प्रेयसी झाली नव्हती..
‘करण अर्जुन’च्या वेळी शाहरुख-अजय एकत्र
येण्याचा योग हुकला तो कायमचा!
आता ‘सन ऑफ सरदार’ व ‘जब तक है जान’च्या स्पर्धेत ते एकमेकांसमोर उभे ठाकलेत. मसालेदार मनोरंजनामुळे सरदारचे पारडे जड वाटते,
यश चोप्रांबाबतची विश्वासार्हता व सहानुभूती यामुळे ‘जब तक है जान’ही जोरात आहे.
या स्पर्धेला आणखी काही
बाजू आहेत. ‘सरदारीण’ सोनाक्षी सिन्हाच्या खात्यात ‘जोकर’ वगळता यशच यश, कतरिना कैफ ‘नंबर वन
तारका’ असल्याने तिच्या यशाची मोजदाद करायला वेगळे थर्मामीटर नको. शाहरुख-कतरिना हा नवा ‘जोडा’ दिसतोही छान.
शाहरुख-अजयच्या
स्पर्धेपेक्षा या जमेच्या बाजू जास्त महत्त्वाच्या आहेत..
अजय विरुद्ध शाहरुख
शाहरुख खान विरुद्ध अजय देवगण यांच्यात ‘पहिला सामना’ कधी रंगला माहित्येय? राकेश रोशनने ‘करण अर्जुन’साठी त्या दोघांना एकत्र आणले होते. राजकमल स्टुडिओत चित्रीकरणही सुरू झाले नि कशावरून तरी अजयने चित्रपट सोडला व त्याच्या जागी सलमान खान आला..
First published on: 09-11-2012 at 04:43 IST
मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay and sharukh movie compition in allotments of theaters