मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय जाधव यांचा ‘लकी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटामधील खलनायकाच्या भूमिकेचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. या खलनायकाची भूमिका धैर्यशील याने साकारली होती. विशेष म्हणजे खलनायक म्हणून लोकप्रियता मिळविलेला धैर्यशील आता लवकरच अभिनेता अजय देवगणच्या ‘तानाजी’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्वराज्य’निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच तानाजी मालुसरे होय. तानाजींच्या पराक्रमाची कथा लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण तानाजी ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. त्याच्यासोबतच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार मंडळीही यात झळकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्येच आता या कलाकारमंडळींसोबत धैर्यशीलदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटामध्ये धैर्यशील तानाजींच्या सैन्यातल्या मावळ्याच्या भूमिका साकारणार आहे.

‘तानाजी’मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अजिंक्य देवदेखील झळकणार आहे. त्यानंतर आता धैर्यशीलची सुद्धा वर्णी लागली आहे. त्यामुळे तानाजीमध्ये दोन मराठी चेहरे झळकणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. दरम्यान, धैर्यशीलने ‘गोष्ट एका जप्तीची’, ‘एकाच ह्या जन्मी जणू’ या टिव्ही मालिकांमधून काम केलं आहे. तर अवधूत गुप्तेच्या ‘एक तारा’ चित्रपटातही त्याने काम केले आहे.

 

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgn film taanaji the unsung warrior new marathi actor ssj