मे महिन्याच्या अतिथी विश्लेषक आहेत प्राची अशोक जोशी. त्यांनी पुणे विद्यापीठातून धातूशास्त्र या विषयात बीईची पदवी घेतल्यावर काही काळ पुणे येथील टाटा मोटर्सच्या कारखान्यात अनुभव घेतला. त्या एक्सएलआरआय जमशेदपूर या संस्थेतून एमबीए झाल्या असून, त्या जेपी मॉर्गनच्या अॅसेट मॅनेजमेंट (एशिया) सिंगापूर येथे समभाग विश्लेषक होत्या. जेपी मॉर्गनमध्ये रुजू होण्यापूर्वी त्या एसबीआय म्युच्युअल फंड व आदित्य बिर्ला प्रायव्हेट इक्विटीमध्ये समभाग संशोधक म्हणून कार्यरत होत्या. ज्या कंपन्यांची उत्पादने औद्योगिक वापरासाठी (Industrial Use) आहेत अशा समभागांचा माग ही त्यांच्या एकूण नऊ वर्षांच्या समभाग संशोधन अनुभवाची खासियत आहे.
ही कंपनी १९९० मध्ये एन्काई कास्टअलॉय या नावाने स्थापन झाली. पिगॅसस कास्टअलॉय लिमिटेड या कंपनीने जपानच्या एन्काई कास्टअलॉय बरोबर संयुक्तरीत्या या कंपनीची स्थापना केली. एन्काई कास्टअलॉय ही अल्युमिनियम कािस्टग क्षेत्रातील सध्या जगातील सर्वात मोठी उत्पादन क्षमता असलेली कंपनी आहे. दुचाकी व प्रवासी वाहनांसाठी वापरली जाणारी ‘अलॉय व्हिल्स’ ही या कंपनीची प्रमुख उत्पादने आहेत. २००६ मध्ये कंपनीने ‘अलॉय व्हिल्स’ उत्पादनास प्रारंभ केला. चिनी उत्पादकांकडून असलेल्या स्पध्रेमुळे कंपनीला मोठय़ा नुकसानीला तोंड द्यावे लागले. म्हणून कंपनीला अतिरिक्त निधीची आवश्यकता भासू लागली. म्हणून जपानी भागीदाराने अतिरिक्त भागभांडवलाच्या रूपाने निधी आणला. पुढे व्यवस्थापनाने अलॉय व्हील उत्पादनासाठी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्याचे ठरविले. ही कंपनी ‘एन्काई व्हील्स’ या नावाने ओळखली जाऊ लागली. मूळ कंपनीपासून अलॉय व्हील व्यवसाय वेगळा करून या कंपनीचे समभाग १:१ या प्रमाणात भागधारकांना देण्यात आले. २०१० मध्ये या कंपनीचे नांव बदलून ‘एलीकॉन कास्टअलॉय’ असे करण्यात आले. ही कंपनी ‘स्पेशल पर्पज व्हेइकल’ असून आíथक आपत्तीत सापडलेल्या युरोपमधील ऑस्ट्रिया आणि स्लोव्हाकियातील आजारी कारखाने या कंपनीने विकत घेतले. यापकी इलिचमन ही युरोपातील वाहनांसाठीच्या सुटे भाग उद्योगातील एक प्रतिष्ठित नाममुद्रा आहे. ही कंपनी युरोपमधील सीमेन्स, अरिवा, अॅटलास काप्को आदी भांडवली वस्तू उत्पादकांची पुरवठादार आहे. भारतात क्रॉम्प्टन ग्रीव्हज, किर्लोस्कर, हनीवेल, ब्लूस्टार आदी बिगर वाहन उत्पादकांना ही कंपनी आपल्या सुटय़ा भागांचा पुरवठा करते.
अल्युमिनियम कािस्टग उत्पादने जपान तसेच पश्चिम व दक्षिण भारतातील उत्पादकांना पुरवठा करण्यासाठी एलीकॉन समूहाचा एक कारखाना भारताचा ‘ऑटो हब’ समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात आणि उत्तर व पूर्व भारतातील उत्पादकाच्या पुरवठ्यासाठी दिल्लीजवळ गुरगाव येथे आहे. या कारखान्यातून सँड कािस्टग, प्रेशर डाय कािस्टग, लो प्रेशर कािस्टग (ग्रॅव्हिटी कािस्टग) आदी पद्धतीने उत्पादन केलेले सुटे भाग वाहन उत्पादकांना पुरविले जातात. २०१२-१३च्या कंपनीच्या वार्षकि अहवालानुसार कंपनीच्या विक्रीपकी ३८ टक्के विक्री ‘अलॉय व्हील’ या उत्पादनातून होते.
भारतात पायाभूत क्षेत्रात मोठी गुंतवणूक होऊ घातली आहे. याचा वाणिज्य वाहने, भांडवली वस्तू या क्षेत्रावर सकारात्मक परिणाम संभवतो. कंपनीने वाहन उद्योगाव्यतिरिक्त इतर उद्योगांसाठी अनेक उत्पादने विकसित केली आहेत. अल्युमिनियम कािस्टग क्षेत्रातील ही भारतातील सर्वात मोठी उत्पादन क्षमता असलेली कंपनी आहे. या कंपनीची उत्पादने मूल्यवíधत साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर उपलब्ध आहेत. कंपनीने उत्पादनक्षमता वाढीच्या योजना आखल्या असून विमान वाहतूक, संरक्षण, वैद्यकीय उपयोग, शेती, संशोधन, उर्जानिर्मिती या उद्योगांसाठी उत्पादने विकसित करत आहे. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, बजाज ऑटो, फोर्ड इंडिया, मिहद्र, हीरो मोटोकोर्प, टीव्हीएस मोटर्स, टॅफे, ह्य़ुंडाई, फियाट आदी वाहन उत्पादक हे या कंपनीचे देशी ग्राहक आहेत तर बीएमडब्ल्यू, जॉन डीअर हे विदेशी ग्राहक आहेत.
अल्युमिनियम व्हील्सच्या जोडीला सििलडर हेड, इंजिन सपोर्ट ब्लॉक, क्रँक शाफ्ट आदी सुट्या भागांचे ही कंपनी उत्पादन करते. वाहन उद्योगात या सुट्या भागांना ‘क्रिटिकल कॉम्पोनंटस’ असे म्हटले जाते. ‘क्रिटिकल कॉम्पोनंटस’चा दर्जा अत्यंत काटेकोरपणे तपासला जातो. कारण वाहन सुरू असताना या सुट्या भागांचे काम बंद पडले तर अपघाताला सामोरे जावे लागते. म्हणून या सुट्या भागासाठी दर्जेदार उत्पादकाची निवड होते. या पुरवठादारास ‘सोल सप्लायर’ अशी संज्ञा या उद्योगात वापरली जाते. एलीकॉन कास्टअलॉय ही कंपनी अनेक वाहन उत्पादकांची सोल सप्लायर आहे. उदाहरण देऊन सांगायचे तर एप्रिल २०१४ मध्ये विकल्या गेलेल्या मारुती अल्टो, मारुती स्विफ्ट, मारुती डिझायर, मारुती वॅगन आर, ह्य़ुंडाई आयटेन, मिहद्र बलेरो, ह्य़ुंडाई इऑन, ह्य़ुंडाई आयट्वेंटी, टाटा इंडिका (व्हिस्टा सहित), होंडा अमेझ, टोयोटा इनोव्हा, मारुती अर्टिगा, ह्य़ुंडाई सँट्रो, रेनो डस्टर, फोर्ड इकोस्पोर्टस् या ‘टॉप टेन’ वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक सुट्या भागांसाठी ही कंपनी सोल सप्लायर आहे.

Story img Loader