Ind vs Aus 2nd Test Day 1 Live – भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ६ बाद २७७ धावा केल्या. सलामीवीर हॅरिस, फिंच आणि मधल्या फळीतील हेड या तिघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ही मजल मारली. शॉन मार्शनेही ४५ धावांची खेळी केली. ४ वेगवान गोलंदाज घेऊन खेळणाऱ्या भारताला दिवसभरात सहा बळी टिपता आले. मात्र त्यापैकी २ गडी फिरकीपटू हनुमा विहारीने बाद करत आपली उपयुक्तता सिद्ध केली.

दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फिंच आणि हॅरिस यांनी अतिशय सावध पवित्रा घेत डावाला सुरुवात केली. १५ व्या षटकात अर्धशतक गाठलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी त्यानंतर तर अधिक संथ खेळ केला. त्यामुळे उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २६ षटकात बिनबाद ६६ धावा इतकी झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात ठेवलेली फलंदाजीची संथ लय कायम ठेवत चहापानापर्यंत ३ बाद १४५ अशी मजल मारली. पहिल्या सत्रात एकही बळी न गमावलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सत्रात ३ बळी गमावले. बुमराह, उमेश यादव आणि हनुमा विहारी यांनी १-१ बळी घेतले. शेवटच्या सत्रात मधल्या फळीतील फलंदाज पीटर हॅंड्सकॉम्ब ७ धावा करून बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. विराट कोहलीने स्लिपमध्ये अफलातून झेल टिपत त्याला माघारी धाडले. इशांतने त्याचा काटा काढला. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या शॉन मार्शला ४५ धावांवर झेलबाद व्हावे लागले. विहारीने ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. मार्शने ९८ चेंडूत ही खेळी केली. त्यानंतर संयमी खेळी करणारा ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड अर्धशतक ठोकून बाद झाला. अर्धशतक झाल्यानंतर मोठा फटका मारताना तो ५८ धावांवर बाद झाला.

दरम्यान, या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. हीच विजयी लय कायम ठेवण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरला आहे. तर मायभूमीत भारताविरुद्ध प्रथमच सलामीचा कसोटी सामना गमावण्याची नामुष्की ओढवल्यामुळे हा सामना जिंकून मालिकेत ‘कमबॅक’ करण्याचा ऑस्ट्रेलियन संघाचा मानस आहे.

Live Blog

15:25 (IST)14 Dec 2018
कांगारुंची चिवट खेळी; पहिल्या दिवसअखेर ६ बाद २७७

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ६ बाद २७७ धावा केल्या. सलामीवीर हॅरिस, फिंच आणि मधल्या फळीतील हेड या तिघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ही मजल मारली. शॉन मार्शनेही ४५ धावांची खेळी केली. ४ वेगवान गोलंदाज घेऊन खेळणाऱ्या भारताने दिवसभरात सहा बळी टिपता आले. मात्र त्यापैकी २ गडी फिरकीपटू हनुमा विहारीने बाद करत आपली उपयुक्तता सिद्ध केली.

14:48 (IST)14 Dec 2018
ऑस्ट्रेलियाचा सहावा गडी बाद, अर्धशतकवीर ट्रेव्हिस हेड माघारी

संयमी खेळी करणारा ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड अर्धशतक ठोकून बाद झाला. अर्धशतक झाल्यानंतर मोठा फटका मारताना तो ५८ धावांवर बाद झाला.

14:30 (IST)14 Dec 2018
ट्रेव्हिस हेडचे ७० चेंडूत अर्धशतक

पहिल्या सामन्यात चांगला खेळ करणारा ट्रेव्हिस हेड या सामन्यातही चांगला खेळी करत आहे. त्याने ७० चेंडूत अर्धशतक केले. या खेळीत त्याने ५ चौकार लगावले.

14:26 (IST)14 Dec 2018
शॉन मार्श ४५ धावांवर झेलबाद, ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का

खेळपट्टीवर स्थिरावलेल्या शॉन मार्शला ४५ धावांवर झेलबाद व्हावे लागले. विहारीने ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. मार्शने ९८ चेंडूत ही खेळी केली.

13:01 (IST)14 Dec 2018
पीटर हॅंड्सकॉम्ब बाद; ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का

मधल्या फळीतील फलंदाज पीटर हॅंड्सकॉम्ब ७ धावा करून बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला. विराट कोहलीने स्लिपमध्ये अफलातून झेल टिपत त्याला माघारी धाडले.

--

12:37 (IST)14 Dec 2018
ऑस्ट्रेलियाची संथ फलंदाजी; चहापानापर्यंत ३ बाद १४५

ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात ठेवलेली फलंदाजीची संथ लय कायम ठेवत चहापानापर्यंत ३ बाद १४५ अशी मजल मारली. पहिल्या सत्रात एकही बळी न गमावलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सत्रात ३ बळी गमावले. बुमराह, उमेश यादव आणि हनुमा विहारी यांनी १-१ बळी घेतले.

12:16 (IST)14 Dec 2018
हॅरिस ७० धावांवर माघारी; हनुमा विहारीचा पहिला बळी

खेळपट्टीवर तग धरून झुंजार खेळी करणारा मार्कस हॅरिस ७० धावांवर माघारी परतला. वेगवान गोलंदाजांना विश्रांती देण्यासाठी म्हणून पर्यायी गोलंदाज हनुमा विहारीला गोलंदाजी देण्यात आली आणि त्याने आपला या दौऱ्यातील पहिला बळी टिपला. हॅरीसने १४१ चेंडूत १० चौकारांसह ७० धावा केल्या.

12:05 (IST)14 Dec 2018
उस्मान ख्वाजा झेलबाद, ऑस्ट्रेलियाचा दुसरा गडी माघारी

अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजा झेलबाद झाला आणि उमेश यादवने ऑस्ट्रेलियाचा दुसरा गडी माघारी धाडला. ख्वाजाने ३८ चेंडूत केवळ ५ धावा केल्या.

11:12 (IST)14 Dec 2018
फिंच अर्धशतकानंतर पायचीत; ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिंच अर्धशतक झळकावल्यानंतर लगेचच बाद झाला. त्याने १०५ चेंडूत ५० धावा केल्या. बुमराहने त्याला तंबूत पाठवत भारताला पहिले यश मिळवून दिले.

10:52 (IST)14 Dec 2018
हॅरीसने झळकावले पहिलेवहिले कसोटी अर्धशतक

संथ आणि संयमी सुरुवात करणाऱ्या हॅरीसने अखेर आपले कसोटी क्रिकेटमधील पहिलेवहिले अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासाठी त्याने ९० चेंडू खेळले. या खेळीत त्याने ९ चौकार लगावले.

हॅरीसने झळकावले पहिलेवहिले कसोटी अर्धशतक
Caption
09:56 (IST)14 Dec 2018
ऑस्ट्रेलियाची संथ सुरुवात; उपहारापर्यंत बिनबाद ६६

१५ व्य षटकात अर्धशतक गाठलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी त्यानंतर अधिक संथ खेळ केला. त्यामुळे उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २६ षटकात बिनबाद ६६ धावा इतकी झाली आहे. हॅरिस ३६ तर फिंच २८ धावांवर खेळत आहे.

08:40 (IST)14 Dec 2018
ऑस्ट्रेलियाची संथ सुरुवात; १० षटकात बिनबाद ३७

पहिल्या सामन्यात फारशी चांगली सलामी भागीदारी न करता आलेल्या हॅरिस-फिंच जोडीने या सामन्यात संथ सुरुवात केली आहे. सावधपणे खेळ करत ऑस्ट्रेलियाने १० षटकात बिनबाद ३७ अशा धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे.

07:29 (IST)14 Dec 2018
हनुमा विहारी, उमेश यादवला संधी; रोहित, अश्विन संघाबाहेर

भारतीय संघातून मधल्या फळीतील रोहित शर्मा आणि गोलंदाज अश्विन यांना संघातून वगळण्यात आले आहे. रोहितच्या जागी हनुमा विहारी तर अश्विनच्या जागी उमेश यादवला संघात स्थान देण्यात आले आहे.

07:26 (IST)14 Dec 2018
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली; प्रथम फलंदाजीचा निर्णय

पर्थ येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली असून कर्णधार टीम पेन याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघात एकही बदल करण्यात आलेला नाही.