शेतकऱ्यांसाठी अतियश उपयुक्त प्राणी म्हणून बैल ओळखला जातो. बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलाच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतात. पण हा दिवस अंधश्रद्धा बाळगून साजरा करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून हा सण साजरा करण्याची गरज आहे. आषाढ, श्रावण किंवा भाद्रपद आणि कार्तिक महिन्याच्या अमावस्येला प्रदेशपरत्वे बैलपोळा सण साजरा केला जातो. विदर्भ, मराठवाडा भागात श्रावण अमावस्येला बेंदूर साजरा करण्याची परंपरा आहे. कर्नाटक आणि सीमावर्ती गावांतही बेंदूर साजरा करण्याची परंपरा आहे. तथापि श्रावण अमावस्या व भाद्रपद अमावस्या या दोन अमावस्या बैलपोळा म्हणून ओळखल्या जातात. बैलपोळा, नंदीपोळा व बेंदूर असे लोकसंस्कृतीत तीन वेगवेगळे प्रकार आहेत. १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या काही भागांत बैलपोळा साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने शेतकऱ्यांनी जनावरांना निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

१. फऱ्या, घटसर्प यामुळे दगावणाऱ्या जनावरांचे प्रमाण अधिक असल्याने या रोगांसाठी नियमित लसीकरण करण्याचा निश्चय करा.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Mumbai municipal corporation land auction
पालिकेचे भूखंड विकासकांना नकोसे, प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुनर्निविदा काढण्याची पालिकेवर नामुष्की, मलबार हिलचा भूखंड वगळणार
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार
liquor Nashik district, Illegal liquor stock Nashik district,
नाशिक जिल्ह्यात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
lonar lake flamingos marathi news
Video : ‘फ्लेमिंगो’ला आवडले लोणार सरोवर
bmc will provide free Shadu soil and space to sculptors for eco friendly Ganeshotsav
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना पुढील वर्षीही शाडूची माती मोफत देणार

२. जनावराला आंघोळ घालून स्वच्छ करताना गोठाही साफ करण्यास विसरू नका. गोठय़ातील दगड, लाकडे यांच्याखाली जंतुनाशके फवारून घ्या. यामुळे गोचिडासारख्या परजीवी कीटकांचे अस्तित्व नष्ट होईल.

३. गोठय़ाच्या भिंती, पिण्याच्या पाण्याचा हौद यांना स्वस्तात उपलब्ध असणारा चुना द्या.

४. नवीन संकरित जनावरांबरोबरच जातिवंत व गुणवंत देशी जनावरांचे संगोपन करा. यामध्ये देवणी, लालकंधारी, गीर या व इतर जातींचा समावेश करा.

५. आजचे वासरू उद्याचा उत्तम बैल होण्यासाठी त्याची योग्य निगा राखा.

६. पशुवैद्यकांच्या मदतीने गावामध्ये पशुआरोग्य निदान व उपचार शिबिरांचे आयोजन करा.

७. ऊर्जानिर्मितीसाठी शेणाचा उपयोग करून गोबरगॅस संकल्पनेचा अवलंब करा. ग्रामीण भागातील वाढत्या भारनियमनावर गोबरगॅस हा एक उत्तम उपाय आहे. शिवाय प्रदूषणविरहित इंधन असल्याने निसर्गालाही एक प्रकारे मदत होईल.

८. गोठय़ातील जनावरांच्या विविध नोंदी, नोंदविरहित केल्यामुळे व्यवस्थापन सुलभ होईल. निदान पोळा या सणाच्या निमित्ताने व्यवस्थापन सुधारण्यासाठी खर्च करा.

९. गावस्तरावर सहकाराच्या माध्यमातून दूध संकलन केंद्राची स्थापना करावी. अहमदनगर, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्य़ांमध्ये सहकारामुळे गोधनाची प्रगती झालेली आहे. अनेक नामवंत सहकारी दूध संस्था आज देशपातळीवर इतरांसाठी एक आदर्श ठरल्या आहेत.

१०. जनावरे आजारी पडल्यास कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडण्याचा निश्चय शेतकऱ्यांनी करावा.

बैलपोळा सणाच्या दिवशी शेतकऱ्यांनी शेतीस उपयुक्त जनावरांची काळजी घेणारे कार्यक्रम राबवून त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तरच या जनावरांबाबत खरी कृतज्ञता व्यक्त केल्याचे समाधान शेतकऱ्यांना मिळेल.

पोळ्याच्या दिवशी हे टाळा..

  • नाकातून तेल पाजणे.
  • जनावराचे तोंड धरून पाण्यात बुडविणे.
  • शिंगांच्या सुशोभीकरणासाठी शिंगे साळणे.
  • विविध रंगांचा व वॉर्निशचा उपयोग रंगविण्यासाठी करणे.
  • मिरवणुकीदरम्यान बैलांना दारू पाजणे व इतर गांजासारखे पदार्थ खाऊ घालणे.
  • पुरणपोळीचा नैवेद्य भरपूर खाऊ घालणे.
  • मिरवणुकीवेळी गुलालासारखे घातक पदार्थ उधळणे.
  • नायलॉन दोरीची वेसण घालणे.

pankaj_hase@rediffmail.com

Story img Loader