देशातील बँकिंग क्षेत्रात येत्या दोन वर्षांत मोठे बदलाचे संकेत रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शुक्रवारी पुण्यात बोलताना व्यक्त दिले. विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा या बदलांमध्ये मोठा वाटा असेल, असे त्यांनी सांगितले.
‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग मॅनेजमेंट- एनआयबीएम’च्या दीक्षान्त समारंभासाठी आलेले राजन यांनी मोठय़ा संख्येने अर्ज दाखल झालेल्या लघु बँका आणि पेमेंट बँकांसाठी भविष्यात मोठय़ा संधी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘बँकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाचे स्वरूप बदलणार आहे. सामाजिक क्षेत्रात उतरून ग्राहकवर्ग विस्तारण्याचा प्रयत्न अनेक बँकांकडून केला जाईल.’’
भरला राजन सरांचा तास!
बँकिंगच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रघुराम राजन म्हणाले, ‘मी शिकलो त्यापेक्षा आज शिक्षणाच्या संधीमध्ये खूप वाढल्या आहेत. आजचे तरुण हे उपलब्ध असलेली नोकरी आवडीची नसेल तर तिच्याशी जुळवून घ्या अथवा स्वत:साठी नोकरी तयार करा, असे करत आहेत. आपण करत असलेल्या कामाकडून नक्की काय हवे हे अनेकांना कळतच नाही. बहुतेकांना नोकरीत बढती हवी असते. सर्वोच्चपदावर नजर असते. पण तिथपर्यंत पोहोचतो तेव्हा मध्ये बराच काळ निघून गेलेला असतो. मग हे पद मिळवणे खरेच महत्त्वाचे होते का, असे वाटू लागते. मी माझी अनेक वर्षे अशाच धडपडीत घालवली आहेत. आपण जे काम करतो त्यावर आपले प्रेम असायला हवे. नवीन आव्हाने हाताळणे, शिकत जाणे या नोकरीतल्या सर्वोत्तम गोष्टी असतात. आव्हाने नसलेली पण ‘सुरक्षित’ नोकरी पुढे जाऊन कंटाळवाणी होत जाते.
बँकिंग क्षेत्रात दोन वर्षांत मोठे बदल : रघुराम राजन
देशातील बँकिंग क्षेत्रात येत्या दोन वर्षांत मोठे बदलाचे संकेत रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शुक्रवारी पुण्यात बोलताना व्यक्त दिले.
आणखी वाचा
First published on: 11-04-2015 at 02:12 IST
Web Title: Banking sector reforms raghuram rajan