आजच्या काळात बारा बारा तास काम करून दमून थकून घरी आल्यावर कधी एकदा जेवणं उरकून झोपायला जातो असं झालेलं असतं. त्यामुळे सुट्टीच्या दिवसांव्यतिरिक्त आपण घरात जितका वेळ असतो, त्यापकी बराच वेळ आपण बेडरूममध्येच घालवत असतो. आपली बेडरूमच आपल्याला विसावा देते. सकाळी झोपून उठल्यावर आपण पुन्हा ताजंतवानं होऊन कामाला लागतो. त्यामुळे या खोलीत आपल्याला निवांतपणा, एकांत आणि आराम मिळणं गरजेचं असतं. दिवसभरात आपला बराचसा वेळ हा इतरांसाठी कामं करण्यात जातो आणि म्हणूनच वाचन, चिंतन, संगीत ऐकणं किंवा मग नुसताच आराम करणं यांसारख्या कामांसाठी आपण स्वत:करिता जो वेळ काढतो तो वेळ सत्कारणी लावण्यात या खोलीचा मोठा सहभाग असतो. हे लक्षात ठेवून या खोलीचं डिझाइन करावं लागतं.

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
maharashtra winter updates
स्वेटर, शॉल शोधलीत का…? कारण, उद्यापासून हुडहुडी…
rishi kapoor was scared of raj kapoor
वडील घरी आले की घाबरून लपायचो, ऋषी कपूर कारण सांगत म्हणालेले, “ते खोलीत…”
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…

मास्टर बेडरूम म्हटली की, त्यात प्रामुख्यानं येणाऱ्या गोष्टी म्हणजे आरामदायक बेड, वॉर्डरोब किंवा कपडय़ांचं कपाट, एखादं स्टडी किंवा कॉफी टेबल आणि एखाद्दोन खुच्र्या. बेडशीट्स आणि उशांची कव्हर्स ही मऊ तलम कापडाची असावीत. बेडच्या डिझाइनमध्ये कुठेही टोकदार भाग असू नयेत. खोलीतल्या िभतीचा बराचसा भाग हा वॉर्डरोबसाठी वापरला जातो. त्यामुळे यासाठी लागणारी िभत निवडताना सलगपणे पुरेशी लांबी असेल अशी िभत निवडावी. त्यात मध्येमध्ये खिडक्या-दरवाजे येता कामा नयेत. काही वेळा िभतीमधून बीम किंवा कॉलमचा भाग बाहेर आलेला असतो. अशा भागांमुळे एकप्रकारचा खोलगट भाग िभतीत तयार झालेला असतो. अशा खोलगट भागांचा उपयोग हा त्यामध्ये वॉर्डरोब करण्यासाठी करता येऊ शकेल. शक्यतो खोलीतल्या खिडकीसमोरची अखंड असलेली िभत जर वॉर्डरोबसाठी निवडली, तर वॉर्डरोबचे दरवाजे उघडल्यावर खिडकीतून येणारा प्रकाश आत वॉर्डरोबमध्ये पडला की, त्यातले कपडे किंवा इतर सामान काढण्यासाठी दिवसा दिवे लावण्याची आवश्यकता भासणार नाही. अन्यथा वॉर्डरोबच्या आतल्या भागात दिवे बसवून घ्यावेत.

वॉर्डरोब किंवा कुठलंही लाकडी फíनचर विकत घेण्यापेक्षा आपण सुताराकडून ते घरी करून घेणं हे जास्त चांगलं असतं. त्यात घरात पसारा होतो. काम सुरू असताना एक खोली वापरायला कमी मिळते, त्यामुळे गरसोय होते. रोज संध्याकाळी सुतार काम करून जाताना त्यांच्या परीने त्यांना जमेल तशी साफसफाई करत असले, तरी शेवटी आपल्याला खोली आपल्या पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचा त्रास होतो. या सगळ्या अडचणी असल्या, तरी आपल्या गरजांनुसार फíनचर करून घ्यायचे फायदेही आहेत. चार पसे वाचण्याबरोबरच प्लायवुड, लाकूड यांच्या दर्जाबाबत साशंकता असत नाही. यावर आजच्या काळात कधी कधी एक मध्यम मार्गही उपलब्ध असतो. काही सुतार किंवा फíनचरचे दुकानवाले तुमच्या गरजांनुसार तुमच्या घरातल्या खोलीतली मापं घेऊन त्यांच्या कारखान्यात फíनचर तयार करतात आणि ते तुमच्या घरी आणून बसवतात. कधीकधी असं फíनचर अखंड तयार केलं जातं, तर कधी मोठय़ा वॉर्डरोबसारखं फíनचर छोटय़ा भागांमध्ये विभागून, असे छोटे भाग प्रत्यक्ष जाग्यावर जोडून मग त्याला अखंड फíनचर असल्याचा लूक दिला जातो. असं फíनचर तयार करताना सुतार दोन प्रकारे याचा दर सांगतात. चौरस फुटावर सामानासहित वॉर्डरोब करायचा एक दर असतो, तर दुसरा प्रकार म्हणजे त्यासाठी लागणारं प्लायवुड, लाकूड वगरे तुम्ही त्यांना आणून द्यायचं आणि ते तुम्हाला फक्त प्रतिचौरस फूट मजुरीचा दर सांगतात. हा दर सध्या वॉर्डरोबसाठी डिझाइननुसार चारशे ते साडेचारशे रुपये इतका आहे. तर सामानासकट जर वॉर्डरोब करायचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही सुताराला देत असाल, तर मरीन प्लायवूडमध्ये वॉर्डरोब करण्यासाठी प्रतिचौरस फूट सतराशे ते अठराशे रुपयांपर्यंत हा दर असतो. मरीन प्लायवुडऐवजी जर साधं, म्हणजे कमíशयल प्लायवुड वापरलं तर हाच दर प्रतिचौरस फूट साडेअकराशे ते साडेबाराशे रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो. अर्थात या सर्व दरांमध्ये निव्वळ वॉर्डरोब त्याच्या आतला आणि बाहेरचा सनमायका किंवा पॉलिश हे समाविष्ट असलं तरी हँडल्स, कडय़ा व इतर फिक्श्चर्स आणि फिटिंग्ज समाविष्ट नाहीत. कारण या वस्तूंचे असंख्य प्रकार आणि त्यानुसार असलेल्या त्यांच्या किमतींचं वैविध्य इतकं असतं की त्यात हौसेला मोल नाही. त्यामुळेच त्याची निवड तुम्ही करून त्याचे पसे तुम्हाला थेट दुकानदाराला चुकते करायचे असतात. या वॉर्डरोबच्या बाहेरच्या पृष्ठभागावर सनमायका किंवा व्हिनिअर्स लावता येतील. त्याला नसíगक लाकडी लूक अधिक प्रभावीपणे द्यायचा असेल, तर पॉलिशही करून घेता येईल. व्हिनिअर लावलेल्या वॉर्डरोबला एक वेगळ्या प्रकारचा श्रीमंती लूक येतो. पण त्याच्या देखभालीवरही खूप खर्च येतो. पॉलिशचा खर्च तुलनेनं कमी असतो. पण तरीही ठरावीक कालांतरानं पुन्हा पॉलिश लावून घ्यावंच लागतं. आता व्हिनिअरसारखी दिसणारी लॅमिनेट्सही उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या वॉर्डरोबला आपल्याला कमी खर्चातही आकर्षक लूक देता येतो.

या वॉर्डरोबच्या आतले कप्पे हे घरातल्यांच्या गरजेनुसार करून घेता येतात. पण वॉर्डरोबमध्ये नेमक्या कुठल्या वस्तू कुठल्या कप्प्यात ठेवायच्या ते आधीच ठरवून त्याप्रमाणे कप्प्यांची मापं ठरवावी लागतात. यात प्रामुख्याने हँगरला लावलेले कपडे ठेवण्यासाठी कप्पे, इस्त्री करून आलेल्या कपडय़ांच्या घडय़ा ठेवण्यासाठी आवश्यक असलेले कप्पे, टायसाठी असलेले कप्पे, दागिने, पसे यासाठी तिजोरीचा कप्पा, मनगटी घडय़ाळांसारख्या लहानसहान वस्तूंसाठी लागणारा एखादा छोटा ड्रॉवर असे अनेक कप्पे गरजेनुसार करून घेता येतात. बेडरूममध्ये बसून जर पुस्तकं वाचायची असतील, तर एखादं लहानसं स्टडी टेबल करून घेता येईल. किंवा आरामखुर्चीचा एक हात थोडा रुंद करून घेतला, तर त्यावरच पुस्तक किंवा कॉफीचा मग ठेवता येईल. स्टडी टेबल केलं असेल तर एखाद-दोन खुच्र्याही करून घ्याव्या लागतील.

खोलीत जर डबल बेड असेल, तर या बेडच्या मागच्या िभतीवर एखादं नक्षीकाम करून घेता येईल. हा बेड जर घरात किंवा सुताराला ऑर्डर देऊन करून घ्यायचा असेल, तर बेडची मजुरी पाच हजार रुपये प्रतिबेड इतकी, तर साइड टेबलची मजुरी प्रतिटेबलाला अडीच ते तीन  हजार रुपये इतकी असते. सामानासकट जर बेडचं किंवा साइड टेबलाचं काम सुताराला द्यायचं असेल, तर मग प्रतिचौरस फुटाचे जे भाव याआधी सांगितलेत तेच लागू होतील.

आयुष्य संतुलित, आनंदी आणि नियोजित पद्धतीने जगायचं असेल, तर त्यासाठी मुक्त आत्मचिंतनाची आवश्यकता असते. स्वत:चा स्वत:शी असलेला संवाद जितका अधिक प्रभावी आणि चांगला, तेवढा माणूस अधिक विचारी आणि समजूतदार असतो. असा जर स्वसंवाद जर अधिक प्रभावीपणे साधायचा असेल, तर त्याला उपकारक असलेलं बेडरूमचं डिझाइन हे साहाय्यभूत ठरू शकतं. त्यामुळेच घरातल्या इतर कुठल्याही खोलीइतकंच महत्त्व बेडरूमच्या डिझाइनला देणं हेही तितकंच आवश्यक आहे.

सिव्हिल इंजिनीअर

वॉर्डरोबच्या बाहेरच्या पृष्ठभागावर सनमायका किंवा व्हिनिअर्स लावता येतील. त्याला नसíगक लाकडी लूक अधिक प्रभावीपणे द्यायचा असेल, तर पॉलिशही करून घेता येईल. व्हिनिअर लावलेल्या वॉर्डरोबला एक वेगळ्या प्रकारचा श्रीमंती लूक येतो. पण त्याच्या देखभालीवरही खूप खर्च येतो. पॉलिशचा खर्च तुलनेनं कमी असतो. पण तरीही ठरावीक कालांतरानं पुन्हा पॉलिश लावून घ्यावंच लागतं. आता व्हिनिअरसारखी दिसणारी लॅमिनेट्सही उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या वॉर्डरोबला आपल्याला कमी खर्चातही आकर्षक लूक देता येतो.

anaokarm@yahoo.co.in