गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या तिहार तुरुंगात खितपत पडलेल्या सहाराश्रींनी शुक्रवारी सवरेच्य न्यायालयापुढे ‘रहम’ची (दया दाखविण्याची) भाषा केली. न्यायालयाने सांगितलेल्या रकमेची जुळवाजुळव करण्यासाठी आपल्याला तुरुंगाबाहेर जाणे आवश्यक असल्याचे समर्थन सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी यावेळी केले.
न्या. टी. एस. ठाकूर प्रमुख असलेल्या खंडपीठाने मात्र रॉय यांची मागणी धुडकावून लावत त्यांच्या सुटकेवरील, जामिनावरील निर्णय राखून ठेवला. मालमत्ता विक्रीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी तसेच खरेदीदारांबरोबर बोलणी करण्यासाठी आपल्याला सोडावे, अशी मागणी सुब्रतो यांनी वकिल राजीव धवन यांच्यामार्फत न्यायालयाला केली.

Story img Loader