सट्टेबाजाराचा मूड नेहमीच बदलत असतो. या बाजाराला कोणाचेच सोयरसुतक नसते. नफा किंवा फायदा हेच गणित कळत असते. कसोटी सामन्यांमध्ये सपाटून मार खाल्ल्याने भारताला सुरुवातीला सहाव्या क्रमांकावर नेऊन ठेवणाऱ्या सट्टेबाजांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर मात्र भारताला विश्वचषक विजेत्याच्या संभाव्य यादीत नेऊन ठेवले आहे. आता तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेनंतर भारताला पसंती दिली आहे.
अंतिम सामन्यात कोणते संघ येणार, याबाबत ऑस्ट्रेलियाबाबत सट्टेबाजांमध्ये एकवाक्यता आहे. मात्र प्रतिस्पध्र्याबाबत दक्षिण आफ्रिका किंवा भारताला झुकते माप दिले आहे. न्यूझीलंडने स्कॉटलंडविरुद्ध विजय मिळवण्यासाठी विलंब लावल्याचा फटका त्यांना बसला. नवशिक्या आर्यलडकडून पराभव पत्कराव्या लागलेल्या वेस्ट इंडिज संघाचे मनोधर्य खचले आहे. याचा पुरेपूर फायदा सट्टेबाजांनी पाकिस्तानला देऊ केला आहे. सट्टेबाजांना उत्सुकता आहे, रविवारी होणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याची. आताही दक्षिण आफ्रिका सरस आहे. मात्र भारताचा भाव वधारला आहे.
सामन्याचा भाव
पाकिस्तान : ७० पसे; वेस्ट इंडिज : पावणे दोन रुपये
निषाद अंधेरीवाला
भारताचा भाव वधारला
सट्टेबाजाराचा मूड नेहमीच बदलत असतो. या बाजाराला कोणाचेच सोयरसुतक नसते. नफा किंवा फायदा हेच गणित कळत असते.
First published on: 20-02-2015 at 12:51 IST
Web Title: Betting market favours team india