एखाद्याला कोणतीही गोष्ट उगाचच बोलण्याची सवय असते. फुशारक्या मारणाऱ्या अशांना ‘फेकमफाक’ म्हणून संबोधले जाते. नेमके हेच व्यक्तिमत्त्व साकारले आहे भरत जाधव याने ‘फेकमफाक’ या त्याच्या आगामी चित्रपटात. गोपी देसाई ही व्यक्तिरेखा भरतने साकारली असून नेहमी फेकमफाक करणे हाच गोपीचा धंदा असतो.
पण एकदा हीच फेकमफाक त्याच्या अंगलट कशी येते व त्यामधून घडणारे धमाल नाटय़ या चित्रपटामध्ये दाखविण्यात आले आहे.
भरतच्या जोडीला प्रथमच रुचिता जाधव ही नवीन अभिनेत्री असून विजू खोटे, विजय चव्हाण, संजीवनी जाधव, मंगेश देसाई यांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत.
दयानंद राजन दिग्दर्शित या चित्रपटामधील प्रकाश राणे यांनी लिहिलेल्या गाण्यांना सुदेश भोसले, शान आणि साधना सरगम यांचा स्वरसाज चढला आहे. चित्रपटाच्या छायांकनाची धुरा बॉर्डर आणि एलओसी फेम कॅमेरामन करीम खत्री यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट सहकुटुंब सर्वानी पाहावा असा असल्याचा विश्वास भरत जाधव याने यानिमित्ताने बोलताना व्यक्त केला.

Story img Loader