फटफटी हा गावाकडचा मोटारसायकल लाभलेला प्रतिशब्द. ही फटफटी म्हणजे ‘बुलेट’ हे समीकरण जनमानसात पूर्वापार रुजले आहे. ‘बुलेट’वरून फिरणं हे भारतामध्ये आजही सधनतेचं द्योतक समजलं जातं. दारात ‘बुलेट’ असणं हे ऐश्वर्याचे प्रतीक मानण्यात येते. तिच्या विशिष्ठ आवाजामुळे मिळालेली प्रतिष्ठा दुसऱ्या कुठल्याही दुचाकीच्या नाममुद्रेला नाही. याहू आणि गुगलवर या गाड्या वापरणाऱ्यांचा याहूग्रुप किंवा गुगलग्रूप आहे. हे भाग्य या व्यतिरिक्त ‘मर्सिडिज’ या नाममुद्रेला लाभले आहे.
सेन्सेक्सने सरत्या वर्षांत २६% परतावा दिला. सेन्सेक्सच्या तीस शेअर्समध्ये २०१२ मध्ये दैदिप्यमान कामगिरी ठरली ती अनुक्रमे अल्ट्राटेक (१०५%), टाटा मोटर्स (६३%) हिंदुस्थान युनिलिव्हर (६९.२%), आयटीसी (६७%), बजाज ऑटो (६२%), एशियन पेंट्स (५९%), तर सर्वात खराब कामगिरी करणारे ठरले भेल (-४९%), हिंडाल्को (-४२%), रिलायन्स (-३९%). आज समाधान वाटते कारण पहिल्या पाच शेअरपकी तीन शेअरची शिफारस याच स्तंभात जानेवारी ते एप्रिलदरम्यान केली होती तर शेवटच्या पाचपकी एकाचीही शिफारस केली नव्हती. या समाधानाने गतवर्षीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने या सत्राला प्रारंभ करत आहे. आर्थिक व राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करताना या वर्षी चलनवाढीचा दर जानेवारी-जूनदरम्यान ६.७५% ते ७% तर जून-डिसेंबर दरम्यान ६% ते ६.२५% दरम्यान राहील. गेल्या वर्षांत रिझर्व बँकेने व्याजदरात वाढ केली नाही. परंतु अपेक्षेइतकी कपात सुद्धा केली नाही. या वर्षभरात रेपोदरात १% ते १.२५% कपात टप्प्याटप्प्याने होईल. रोख राखीव प्रमाणात अध्र्या टक्क्यांपेक्षा अधिक कपात संभवत नाही. डिसेंबर महिन्यात तीन सत्रात रिझर्व बँकेने रु. ३१,००० कोटी खुल्या बाजारातून रोखे खरेदी करून उपलब्ध करून दिले आहेत. ही रक्कम अंदाजे रोख राखीव प्रमाणाच्या  अध्र्या टक्क्याहून थोडी अधिक कपातीइतकी होते. त्यामुळे लगेचच रोख राखीव दरात कपात होईल असे वाटत नाही. रुपयाच्या डॉलर बरोबरच्या विनिमय दरात फारसा चढ-उतार होईल असे वाटत नाही. अंदाजित वित्तीय तुटीच्या ८०% तूट पहिल्या आठ महिन्यात झाली. सरकार सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५%च्या वर वित्तीय तूट असणार नाही, असे सांगत असले तरी खर्च कमी करण्याचे किंवा कर संकलन वाढण्याचे संकेत दिसत नाहीत. या वर्षी वित्तीय तूट ५.८५ ते ६% असेल असे गृहीत धरून चालण्यास हरकत नाही. म्हणून डॉलरचा विनिमय दर रु. ५२च्या खाली उतरणे कठीण दिसते. एप्रिल-मे २०१४ मध्ये देशात सार्वत्रिक निवडणुका आहेत. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्पात सवलतींचा पाऊस पडेल हे नक्की. परंतु शरद पवार यांनी आळवलेला ‘स्वबळा’चा राग व इतर राजकीय घडामोडी लक्षात घ्याव्या लागतील. हा स्तंभ राजकीय चर्चा करण्याचा नसल्यामुळे जास्त मतप्रदर्शन न करता नवीन गुंतवणूक करताना चालू वर्षांच्या दुसऱ्या सहामाहीत सप्टेंबर-डिसेंबर २०१३ दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घ्यावी. या अर्थ व राजकीय पाश्र्वभूमीवर या वर्षांत आपण वाटचाल करणार आहोत. व्याजदर कमी होतील हे गृहीतक मांडले तर वाहन उद्योग, बँका, पायाभूत सुविधा व स्थावर मालमत्ता विकासक यांना फायदा होईल. ‘व्याजदर संवेदनशील उद्योग’ हे सूत्र घेऊन जानेवारी महिन्याची मालिका गुंफणार आहे. वाहन उद्योगातील सामान्य गुंतवणूकदारांकडून दुर्लक्षित राहिलेली एक कंपनी आयशर मोटर्सचा परिचय  आजच्या भागात करून घेऊ.
आयशर मोटर्स लिमिटेड
१९४८ साली गुडअर्थ लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली. कालांतराने उत्पादनात व नावांत बदल होत आजची आयशर मोटर्स (आयशर) ही कंपनी अस्तित्त्वात आली. मध्यम व उच्च क्षमतेची व्यावसायिक मालवाहक वाहने, प्रवासी वाहतूक करणारी वाहने, ट्रॅक्टर, मालवाहक ट्रॉली, ‘व्होल्वो’ नाममुद्रेच्या बस, ‘व्होल्वो’ ट्रेलर, व ‘रॉयल एनफिल्ड बुलेट’ या दुचाक्याही या कंपनीच्या आहेत. ‘व्होल्वो’ वाहने तयार करण्यासाठी ५०:५० धर्तीचा संयुक्त प्रकल्प ‘व्होल्वो-आयशर कमर्शियल व्हेइकल्स लिमिटेड’ या नावाने स्थापला आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात ट्रक व बस व्यवसाय मागील महिन्यापेक्षा २०% दराने तर वार्षकि १३% दराने वाढला. डिसेंबर महिन्यात ४०३२ वाहने विकली. ज्या गटात ८०% वाहने विकली जातात त्या हलक्या व मध्यम क्षमतेच्या वाहनांच्या विक्रीत टाटा मोटर्ससह, अशोक लेलँड या उत्पादकांनी चांगली कामगिरी केली आहे. हा व्यवसाय एप्रिल महिन्यात मध्यम क्षमतेच्या वाहनांसाठी इंजिन जुळणी करणारा प्रकल्प सुरु करणे अपेक्षित आहे. या प्रकल्पात युरो-५ व युरो-६ निकषांमध्ये बसणारी इंजिन तयार करण्यात येणार आहेत. या कारखान्यातून तयार होणारे २५% उत्पादन अन्य वाहननिर्मात्यांना पुरवठा करण्यात येणार आहे. एकूण नफ्यात १२% तर विक्रीत ३०% वाढीचे योगदान या नवीन कारखान्याचे राहणार आहे.
‘रॉयल एन्फिल्ड’ ही नाममुद्रा सध्या उत्पादन होत असलेल्या दुचाक्यात सर्वात जुनी आहे. १८९० मध्ये ‘ब्रिटिश क्राउन’ या कंपनीकडून तो नोंदविला गेला. १९९५-९६ मध्ये आयशरने चेन्नईस्थित एनफिल्ड इंडियाचे अधिग्रहण केल्यावर ही नाममुद्रा आयशरच्या मालकीची झाली. ‘रॉयल एन्फिल्ड’ या मुख्य नाममुद्रेअंतर्गत ‘थंडरबर्ड’, ‘बुलेट’ व ‘क्लासिक’ या उप-नाममुद्रा आहेत. सर्व नाममुद्रा मिळून १४ विविध क्षमतेच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दुचाक्या विकल्या जातात. १९५५ मध्ये या दुचाकीस या नाममुद्रेने प्रारंभ झाला. सुरवातीच्या काळात पोलीस व संरक्षण दल यांचा वापर करीत असे. ‘सिंटेक्स’ म्हणजे पोटमाळ्यावर ठेवायची पाण्याची टाकी व ‘कोलगेट’ म्हणजे दात घासायची पेस्ट या समीकरणाप्रमाणे फटफटी (गावाकडचा मोटारसायकलचा प्रतिशब्द) म्हणजे ‘बुलेट’ हे समीकरण जनमानसात रुजले आहे. ‘रॉयल एनफिल्ड बुलेट’ ही स्वत:चा खास ग्राहकवर्ग असलेली दुचाकी आहे. हा वर्ग कधीही बजाज किंवा हीरो मोटोकॉर्पच्या दुचाक्या वापरणार नाही. ‘बुलेट’वरून फिरणं हे भारतामध्ये साधनतेचं द्योतक समजलं जात. दारात ‘बुलेट’ असणं हे ऐश्वर्याचे प्रतीक मानण्यात येते. तिच्या विशिष्ठ आवाजामुळे मिळालेली प्रतिष्ठा दुसऱ्या कुठल्याही दुचाकीच्या नाममुद्रेला नाही. आजही बाजूने जाणारी बुलेट लक्ष वेधून घेते. याहू आणि गुगलवर या गाड्या वापरणाऱ्यांचा याहूग्रुप किंवा गुगलग्रूप आहे. हे भाग्य या व्यतिरिक्त ‘मर्सििडज’ या नाममुद्रेला लाभले आहे. म्हणूनच या उत्पादनांसाठी सध्या सहा ते आठ महिन्यांचा प्रतीक्षा काळ आहे, हा प्रतीक्षा काळ निम्म्यावर आणणाऱ्या नवीन कारखान्याची उभारणी अखेरच्या टप्प्यात असून एप्रिल महिन्यात उत्पादनांची चाचणी सुरु होईल. थंडर बर्ड व कॅफे रेसर ही दोन नवीन उत्पादने बाजारात उतरविली असून त्यास ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला आहे. ३५०-५०० सीसी क्षमतेच्या इंजिन असणाऱ्या दुचाक्यांच्या गटात या कंपनीचा वाटा ९०% आहे. या गटात कंपनीला स्पर्धा आहे ती आयात केलेल्या दुचाक्यांकडून. एकाही देशांतर्गत उत्पादक या कंपनीचा स्पर्धक नाही. गेल्या पाच वर्षांत कंपनीने नवीन उत्पादने विकसित करून दुचाकी उत्पदनांची मालिका विस्तृत केली आहे. २००६ साली ३३,००० वाहनांचा खप २०१२ मध्ये ८५,००० वर गेला असून २०१६ मध्ये २,२०,००० होणे अपेक्षित आहे. २०१३-२०१६ दरम्यानची वाढ ३५% असेल. दुचाकी व्यवसायाची नफाक्षमता वाढीव उत्पादनांमुळे ३०% ने वाढेल. वरील सर्व गोष्टींचा विचार करता एका वर्षांनंतर रु. ३८०० ते ४००० दरम्यान भाव दिसायला हरकत नाही.
आयशर मोटर्स लिमिटेड
दर्शनी मूल्य     :        रु. १०
मागील बंद भाव     :    रु २८२१.४५    (४ जानेवारी)
वर्षांतील उच्चांक     :    रु. ३२४०.००
वर्षांतील नीचांक     :    रु. ४५६.६५
वर्षांनंतर अपेक्षित भाव     रु. ३८००

India successfully tests anti tank missile Nag Mk 2
शत्रूचा थरकाप उडवणाऱ्या ‘नाग’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; पाकिस्तान-चीनच्या कारवायांना चाप बसणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
terrorist cases are investigated with caste bias
प्रत्येक दहशतवादी प्रकरणाचा तपास जातीय पूर्वग्रहातून, दोषसिद्ध आरोपींचा उच्च न्यायालयातील अपिलात आरोप
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत
Image Of Priyanka Gandhi And PM Modi
Dollar vs Rupee : “रुपयाच्या घसरणीचे सर्व विक्रम मोडले, पंतप्रधानांनी जनतेला उत्तर द्यावे”, प्रियांका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
drugs parli connection loksatta news
“गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्जचे परळी कनेक्शन”, आमदार सुरेश धस यांचा धाराशिवमध्ये गौप्यस्फोट
ruhcir sharma
२०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कशी असेल?
Story img Loader