-
फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रत्येक बँकानी एफडीवरील व्याजरात वाढ केली आहे. यालाच अनुसरून आयसीआयसीआय आणि कॅनरा बँकानेही व्याजदरात वाढ केली आहे.
२ कोटीपेक्षा कमी असणाऱ्या एफडीवरील व्याजदरात वाढ करणारी कॅनरा ही पहिली बँक बनली आहे.
१२ मे २०२२ पासून या व्याजदरात वाढ होईल. ७ ते ४५ दिवसांमधील एफडीवर २. ९० टक्के व्याज देण्यात येत आहे.
१८० ते २६९ दिवसांच्या एफडीवर ४.५० टक्के व्याज देण्यात येत आहे. तर १ वर्षाच्या एफडीवर ५.१ टक्के व्याज देण्यात येत आहे. दोन वर्षाच्या एफडीवर ५.५० टक्के व्याज देण्यात येत आहे.
२७० ते १ वर्षापेक्षा कमी असणाऱ्या एफ़डींवर ४.५५ टक्के व्याज मिळणार आहे. वरिष्ठ नागरिकांना व्याजाचा दर अधिक आहे. हे व्याजदर आरडीवरही लागू होणार आहेत.
तर आयसीआयसी बँकने २ कोटी ते ५ कोटी दरम्यानच्या एफडींवरील व्याजदरात वाढ केली आहे. ७ ते २९ दिवसांच्या एफडीवर ३ टक्के व्याजदर देण्यात येत आहे. आगोदर हा व्याजदर २.७५ टक्के होता.
तर ३० ते ६० दिवसांतील एफडीवर ३.७५ टक्के व्याज देण्यात येणार आहे. आगोदर या एफडींवर ३ टक्के व्याजदर देण्यात येत होते.
तर ६१ ते ९० दिवसांच्या एफडीवर ३.४० टक्के व्याजदर देण्यात येत आहे. आगोदर २.२५ टक्के व्याज देण्यात येत होते.
९१ ते १८४ दिवसांच्या एफडीवरील व्याजदर ३.५ वरून ३.६० केला आहे. तर १८५ ते २७० दिवसांच्या एफडीवरील व्याजदरात कोणताही बदलाव करण्यात आलेला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 14th May 2022 रोजी प्रकाशित
आनंदाची बातमी, या दोन बँकामध्ये फिक्स डिपॉझिटवर मिळणार मोठा फायदा
एफडी गुंतवणूकीवर व्याजदरात प्रत्येक बँकांनी वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे.
Written by दीपाली जाखलेकर

First published on: 14-05-2022 at 18:49 IST
मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Canara bank icici bank hikes interest rates on fixed deposits dpj