मकर : सामूहिक गोष्टींची आवड

अमावास्या सिंह राशीतून तुमच्या अष्टमस्थानात होत आहे. या कालावधीमध्ये उचलली जीभ टाळ्याला लावली असे करू नका. दोन शब्द कमी बोललेले चांगले. वादाचा प्रसंग येणार नाही याची काळजी घ्या. दिनांक ५ सप्टेंबर रोजी मंगळ भाग्यस्थानात कन्या राशीत व शुक्र तूळ राशीत दशमस्थानात प्रवेश करेल. विघ्नहर्ता गणेशाला मनापासून मानवंदना करायला आवडेल. नोकरदार वर्गाने वरिष्ठांशी बढतीसाठी घेतलेली गाठभेट सकारात्मक ठरेल. व्यापारी क्षेत्रात उलाढाल वाढलेली असेल. योग्य व अचूक नियोजनामुळे फायद्याचे प्रमाण चांगले असेल. सार्वजनिक ठिकाणी सामूहिक गोष्टींची आवड राहील. वैवाहिक जोडीदाराच्या कामगिरीची दखल घेत त्यांना अवश्य र्पांठबा द्या. आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल. आरोग्यबाबतीत कोणतीही चालढकल करू नका.

शुभ दिनांक : ८, ९

महिलांसाठी : वातावरण मनासारखे असेल

स्मिता अतुल गायकवाड

Story img Loader