* निर्यातीसहित विक्रीतील ‘रिसिव्हेबल’ना वित्तपुरवठा करण्यासाठी एमएसएमईंना थेट रोखता पाठबळ
* देशातील सर्व एमएसएमईंचे रोखता व डिलेड रिसिव्हेबल्सचे प्रश्न सोडवण्यासाठी उपाय
* सुविधा आता १३ नोव्हेंबर २०१४ पर्यंत उपलब्ध
भारतीय रिझव्र्ह बँकेकडून ५,००० कोटी रुपयांची पुनर्वत्तिपुरवठा करण्याची सुविधा प्राप्त असलेल्या स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी) या लघु व मध्यम उद्योग क्षेत्राच्या विकासाच्या सर्वोच्च संस्थेने देशातील सूक्ष्म, लहान व मध्यम आकाराच्या कंपन्यांना (एमएसएमई) निवडक बँका, एनबीएफसी, फॅक्टिरग कंपन्या व ‘स्टेट फायनान्शिअल कॉर्पोरेशन’मार्फत ‘एक्स्पोर्ट रिसिव्हेबल’सहित ‘फायनान्स रिसिव्हेबल’ना विशेष थेट रोखता पाठबळ देण्याचे ठरवले आहे. सिडबीने पुनर्वत्तिपुरवठा सुविधा १३ नोव्हेंबर २०१४ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याबाबत गेल्याच आठवडय़ात बठकीत, सिडबी संचालक मंडळाने एमएसएमईंना रोखतेचे पाठबळ देण्यासाठी विशेष पुनर्वत्तिपुरवठा सुविधेला मंजुरी दिलीे. सिडबीचे प्रभारी व्यवस्थापकीय उप-संचालक एन. के. मनी यांनी सांगितले की, रिझव्र्ह बँकेने एमएसएमईसाठी सिद्बीमार्फत दिलेली सुविधा मोठ्या संख्येने एमएसएमईपर्यंत पोहोचण्याची आणि एमएसएमईच्या ‘रिसिव्हेबलसाठी क्रेडिट’ सुविधा देऊन त्यामार्फत या क्षेत्राला रोखतेचे पाठबळ देण्याची अपेक्षा आहे.
प्रत्येकी ९० दिवसांच्या ४ चक्रांमध्ये संपूर्ण वापर केल्यास ही सुविधा एकत्रितपणे २०,००० कोटी रुपयांपर्यंत सहाय्य देण्याचा अंदाज आहे आणि यामुळे एमएसएमईंच्या रोखता व डिलेड रिसिव्हेबल्स या प्रश्नांवर मोठय़ा प्रमाणात उपाय होऊ शकेल.
बिले व इन्व्हॉइस याबद्दल, कॉर्पोरेटना वस्तू व सेवा पुरवण्यासाठी एमएसएमई विक्रेत्यांना मदत करण्याचा, तसेच खेळते भांडवल ग्राहकांना गरजेनुसार रोखतेचा पुरवठा करण्याचा सिडबीचा प्रस्ताव आहे. सिडबी १९९१ पासून अशा योजना राबवत आहे आणि एमएसएमई क्षेत्राच्या गरजेनुसार गेल्या काही काळात ‘रिसिव्हेबल फायनान्स’ योजनेची रचना केली आहे.
सूक्ष्म, लहान व मध्यम कंपन्यांना एकंदर आíथक मंदी, बसवलेल्या क्षमतेचा अपुरा वापर व या कंपन्यांनी मोठ्या कंपन्यांना व सरकारी क्षेत्रातील कंपन्यांना केलेल्या पुरवठय़ाचे ‘डिलेड ट्रेड रिसिव्हेबल’ अशा घटकांमुळे रोखतेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.
यामुळे अपुऱ्या असलेल्या पशांच्या ओघामुळे एमएसएमईंच्या दररोजच्या खर्चावर परिणाम होत आहे व त्यांच्या एकंदर वाढीच्या संधींनाही फटका बसतो. काही एमएसएमईंना अपुरे खेळते भांडवल, कच्च्या मालाची वाढलेली किंमत यामुळे हातातील कामांची पूर्तता/मागणी पूर्ण करणेही कठीण होते.
एमएसएमई इको सिस्टिममधील तफावत भरून काढण्यासाठी आणि विविध प्रश्न सोडवण्यासाठी निश उत्पादने, प्रक्रिया व डिलेव्हरी चॅनल विकसीत करणे यासाठी सिडबी प्रयत्न असल्याचे सांगितले जाते.
यामध्ये योग्य रचना असलेल्या व कल्पक उत्पादनांमार्फत डेट् व इक्विटी फंिडगमधील दरी भरून काढणे, या क्षेत्राच्या वाढीसाठी पुनर्वत्तिपुरवठा व संसाधनांचा पािठबा यामार्फत बँका व एनबीएफसीच्या संसाधनांचा वापर करून मार्गदर्शक भूमिका निभावणे यांचा समावेश आहे.
सूक्ष्म, लहान व मध्यम कंपन्यांना सिडबीकडून वर्षभर रोखतेचे पाठबळ
भारतीय रिझव्र्ह बँकेकडून ५,००० कोटी रुपयांची पुनर्वत्तिपुरवठा करण्याची सुविधा प्राप्त असलेल्या स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी) या लघु व
First published on: 10-12-2013 at 08:26 IST
Web Title: Cdb support to micro small and medium companies