अर्थसंकल्पात डेट म्युच्युअल फंडांसाठी पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारणीची करण्यात आलेली तरतूद केंद्र सरकार पुन्हा विचारात घेत असल्याचे समजते. दिर्घकालीन गुंतवणुकीची नव्याने करण्यात आलेली व्याख्या आणि भांडवली लाभावर दुप्पट करण्यात आलेला कर याबाबत पुनर्विचार करण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिल्याने म्युच्युअल फंड उद्योगाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. चालू आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आधीच्या एक ऐवजी तीन वर्षांपर्यंतची गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणूक समजण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. तर गुंतवणुकीतून मिळणाऱ्या भांडवली उत्पन्नावरील २० टक्के कराची तरतूद केली आहे.
डेट म्युच्युअल फंडांच्या तरतुदींबाबत फेरविचार?
अर्थसंकल्पात डेट म्युच्युअल फंडांसाठी पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारणीची करण्यात आलेली तरतूद केंद्र सरकार पुन्हा विचारात घेत असल्याचे समजते.
First published on: 23-07-2014 at 02:31 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government reconsideration regarding the provisions of debt mutual funds