राज्य विधानसभा निवडणुकीची सूत्रे आपल्याकडे असावीत, अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा असल्याचा दावा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केला असला तरी याबाबत आपल्याला काही माहिती नाही, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पवारांकडे नेतृत्व सोपविण्यास विरोध असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले.
नेतृत्व बदलाबाबत दिवसभर चर्चा सुरू होती. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी झाल्यावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नेतृत्व बदलाच्या प्रश्नाला बगल दिली. मात्र, स्वपक्षीय आणि राष्ट्रवादीने तयार केलेल्या वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर आपली बाजू मांजताना मुख्यमंत्र्यांची चांगलीच दमछाक झाली. आपल्या समर्थनार्थ मुख्यमंत्र्यांनी काही अपक्ष आमदारांना बरोबर घेतले होते. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री चव्हाण दिल्लीत तळ ठोकून आहेत.
काँग्रेससमर्थक अपक्ष आमदारांनी चव्हाण यांची बाजू सोनिया गांधी यांच्याकडे मांडली. चव्हाण यांना बदलल्याने फायदा तर होणार नाहीच, उलट नुकसान होईल, याकडे हायकमांडचे लक्ष वेधल्याचे, एका अपक्ष आमदाराने सांगितले. शुक्रवारी रात्री सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल, ज्येष्ठ नेते ए.के. अँन्टोनी यांची चव्हाण यांनी भेट घेतली होती. आज त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली. या भेटींचा तपशील सांगण्यास चव्हाण यांनी नकार दिला.
केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील दारूण पराभवाची समीक्षा करण्यासाठी समिती नेमली असून महाराष्ट्रातील नेत्यांची बठक येत्या २८ तारखेला दिल्लीत आयोजित केली आहे. या बठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, राज्य प्रभारी, प्रदेश कार्यकारिणीतील काही पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात कोणताही निर्णय घेण्यासाठी पक्षनेतृत्वाने पाठबळ दिल्याचा उल्लेख आवर्जून चव्हाण यांनी केला.
आपण लवकर निर्णय घेत नाही, असा तक्रारींचा सूर लावला जात असला तरी जनतेच्या हिताचे रखडलेले अनेक निर्णय घेतल्याकडे लक्ष वेधतानाच राजकारणी आणि ठेकेदारांच्या अभद्र युतीवर अंकुश आणल्याने हितसंबंध दुखावले गेलेले आपल्या विरोधात तक्रारी करीत असल्याचा युक्तिवाद मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी नवी दिल्लीत काँग्रेस हायकमांडकडे केल्याचे समजते.
पवारांच्या नेतृत्वास मुख्यमंत्र्यांचा विरोध
राज्य विधानसभा निवडणुकीची सूत्रे आपल्याकडे असावीत, अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा असल्याचा दावा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केला असला तरी याबाबत आपल्याला काही माहिती नाही, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पवारांकडे नेतृत्व सोपविण्यास विरोध असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले.
First published on: 22-06-2014 at 02:55 IST
Web Title: Cm prithviraj chavan against sharad pawars proposal to lead alliance