एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गळती रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी सांगली दौऱ्यावर येत असताना निवडणुकीच्या मदानात शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण उतरल्या. चव्हाण यांनी मिरज मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांना बोलावून सबुरीचा सल्ला देत कोणालाही उमेदवारी मिळाली तरी पक्षाच्या विजयासाठी कटिबद्ध राहण्याचा सल्ला दिला.
शुक्रवारी काँग्रेसमधील सर्व इच्छुकांना मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण यांनी शासकीय विश्रामधामवर चच्रेसाठी आमंत्रित केले होते. या बठकीस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आनंदा डावरे, अॅड. सी. आर. सांगलीकर, सिद्धार्थ जाधव, बाळासाहेब व्हनमोरे आदी उपस्थित होते.
या वेळी चव्हाण यांनी उमेदवारी एकालाच मिळणार असल्याने एकदिलाने पक्षाचे काम करण्याचा सल्ला दिला. या वेळी तालुक्यातील पूर्व भागातील रखडलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात येईल असे चव्हाण यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी निवडणुकीच्या प्रचारात
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गळती रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी सांगली दौऱ्यावर येत असताना निवडणुकीच्या मदानात शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण उतरल्या.
First published on: 09-08-2014 at 03:34 IST
Web Title: Cm prithviraj chavans wife set assembly polls campaigning