टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये यजमान ऑस्ट्रेलिया संघाच्या अडचणी वाढल्या आहे. कारण अॅडम झाम्पा आणि मॅथ्यू वेड यांची कोविड-१९ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ज्यामुळे ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी भीती व्यक्त केली आहे की, त्यांच्या टीममध्ये व्हायरसची आणखी प्रकरणे असू शकतात.
संघातील एकमेव यष्टिरक्षक वेड हा कोविड-१९ची लागण झालेला दुसरा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे. याआधी बुधवारी लेगस्पिनर अॅडम झाम्पाची चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली होती. वेड मात्र शुक्रवारी पावसामुळे रद्द झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळणार होता.
मॅकडोनाल्ड मॅच रद्द झाल्यानंतर म्हणाले, “संघात कोविड-१९ ची आणखी काही प्रकरणे असण्याची शक्यता आहे. मॅथ्यू वेड रद्द झालेल्या सामन्यात खेळणार होता. त्यामुळे प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने व्हायरसचा फटका बसला असता.”
झाम्पाला यापूर्वी कोविडची लागण झाल्याचे आढळून आले होते आणि ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तो खेळला नाही. आयर्लंडचा जॉर्ज डॉकरेल हा दुसरा क्रिकेटपटू आहे, ज्याची कोविडच चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. परंतु तो रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळला आहे.
ऑस्ट्रेलियन सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला कोविड-१९ साठी पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रकरणांसाठी अनिवार्य अलगाव नियम काढून टाकला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) सध्याच्या नियमांनुसार, पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूला टी-२० विश्वचषक सामन्यात खेळण्यापासून किंवा त्याच्या सहकाऱ्यांसोबत सराव करण्यापासून रोखता येत नाही.