कोब्रापोस्टने उघडकीस आणलेल्या आर्थिक अनियमितता प्रकरणात तीन खासगी बँकांना प्राप्तिकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. कराबाबतची चौकशी म्हणून आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक यांनी संबंधित कागदपत्रे जमा करावीत, असेही या विभागाने म्हटले आहे.
भारतीय रिझव्र्ह बँक आणि वित्तीय तपास गट यांच्यामार्फत महसूल विभागाला सादर करण्यात आलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे प्राप्तिकर विभागाने संबंधित बँकांना नोटीस पाठविली आहे. गेल्या वर्षभराची खाते माहितीही या बँकांना सादर करण्यास सांगितली आहे.
कोब्रापोस्ट संकेतस्थळाने मार्चमध्ये गौप्यस्फोट केल्यानंतर या तीन खासगी बँकांची रिझव्र्ह बँकेनेही चौकशी सुरू केली आहे. संकेतस्थळाने यानंतर ११ हून अधिक राष्ट्रीयीकृत बँकांचीही नावे याच मुद्दय़ावर जाहीर केली होती.
कोब्रापोस्टप्रकरणी तीन खासगी बँकांना प्राप्तिकर विभागाची नोटिसा
कोब्रापोस्टने उघडकीस आणलेल्या आर्थिक अनियमितता प्रकरणात तीन खासगी बँकांना प्राप्तिकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. कराबाबतची चौकशी म्हणून आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक यांनी संबंधित कागदपत्रे जमा करावीत, असेही या विभागाने म्हटले आहे.
First published on: 29-05-2013 at 01:38 IST
Web Title: Cobrapost sting icici axis hdfc banks under i t scanner