अंतर्गत गुणांच्या नावाखाली गुणांची खैरात वाटणाऱ्या महाविद्यालयांना चाप बसावा यासाठी आता लेखी गुणांच्या प्रमाणात अंतर्गत मूल्यांकनाचे गुण कमी करण्याचा (श्रेणी अवतरण – स्केलिंग डाऊन) महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई विद्यापीठाच्या विद्वत सभेने घेतला आहे. मात्र, ही पद्धत अत्यंत गुंतागुंतीची व काही प्रमाणात विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असल्याने तिला विरोध होण्याची शक्यता आहे. अंतर्गत गुणांच्या नावाखाली महाविद्यालये किती सढळ हाताने विद्यार्थ्यांना गुण वाटतात याचे प्रत्यंतर गेल्या दोन वर्षांतील टीवायबीकॉमच्या निकालांनंतर दिसून आले.
एटीकेटीच्या नियमात बदल
आधीच्या नियमानुसार प्रथम वर्षांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या सत्रामध्ये एटीकेटी असलेले विद्यार्थी दुसरे वर्ष उत्तीर्ण झाले तरी त्यांना तिसऱ्या वर्षांला प्रवेश दिला जात नसे. पण, आता ही अट काढून टाकण्यात आली आहे. पदवीच्या कोणत्याही एका वर्षांत एखादा विद्यार्थी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झाला असेल तर त्याला तिसऱ्या वर्षांला प्रवेश दिला जाणार आहे.
महाविद्यालयांना चाप बसणार
अंतर्गत गुणांच्या नावाखाली गुणांची खैरात वाटणाऱ्या महाविद्यालयांना चाप बसावा यासाठी आता लेखी गुणांच्या प्रमाणात अंतर्गत मूल्यांकनाचे गुण कमी करण्याचा (श्रेणी अवतरण - स्केलिंग डाऊन) महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई विद्यापीठाच्या विद्वत सभेने घेतला आहे.
First published on: 08-06-2013 at 01:11 IST
Web Title: Colleges giving internal mark as charity to student will be control