माझ्याकडे मारुती सुझुकी स्विफ्ट कार आहे. कारच्या टायरची काळजी कशी घ्यावी आणि ते केव्हा बदलावे? स्वप्नील पोटे, नेरळ.
’ कारचे टायर हे कारला गती देण्याव्यतिरिक्त कारचे वजन सांभाळणे कार बॅलेन्स्ड ठेवणे असे इतर उद्देश पूर्ण करत असते. टायरची झीज होण्याची बरीच कारणे असू शकतात. ब्रेकचा वापर अतिप्रमाणात किंवा नको तेवढा करणे टय़ूबमध्ये हवेचा प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त असणे कारवर नेहमीच जास्त लोड असणे स्टीअिरग सिस्टीम सदोष असणे इत्यादी. टायरची झीज होण्यामागे व्हील अलाइनमेंट योग्य नसणे हे मुख्य कारण असते. म्हणून व्हेहिकल अलाइनमेंट वेळच्या वेळी करावी. टायरमध्ये हवा भरताना तिचे प्रमाण योग्य आहे कि नाही हे तपासावे. अनावश्यक ब्रेक लावणे टाळावे. जेणेकरून टायरचे रोडशी होणारे घर्षण कमी होईल व पर्यायाने झीज कमी होईल.
एअर क्लिनर कारमध्ये आवश्यक का असते? –मदन सोंडे
’ इंजिनमध्ये इंधन ज्वलनासाठी लागणारी हवा ही वातावरणातून घेतली जाते. त्या हवेमध्ये खूपच सूक्ष्म धुलिकण आणि इतरही काही घटक कण असतात, ज्यांना हवेपासून वेगळे न काढल्यास इंधनाचे ज्वलन नीट होत नाही. आणि याचा परिणाम म्हणजे इंजिन पूर्ण क्षमतेने शक्ती निर्माण करू शकत नाही. म्हणून आत घेतलेली हवा कण विरहित करण्यासाठी एअर फिल्टर वापरतात. एअर क्लिनरचे अनेक प्रकार असतात. जनरली ते म्हणजे वेट टाइप, ड्राय टाइप, आइल बाथ टाइप इत्यादी. यांच्या नावाप्रमाणे त्यांची कार्य लक्षात येते. जसे ड्राय टाइप एअर क्लिनरमध्ये पेपर एलेमेन्ट असतो, ज्याचा गाळणीसारखा उपयोग करून हवा शुद्ध केली जाते. ऑइल बाथ टाइपमध्ये ऑइलचा युज करून हवा शुद्ध करतात.
या सदरासाठी तुमचे प्रश्न bmayurm@gmail.com वर पाठवा.
कारनामा
कारचे टायर हे कारला गती देण्याव्यतिरिक्त कारचे वजन सांभाळणे कार बॅलेन्स्ड ठेवणे असे इतर उद्देश पूर्ण करत असते. टायरची झीज होण्याची बरीच कारणे असू शकतात. ब्
First published on: 02-10-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Common car troubles their causes and solutions