Congress Protest against Inflation : काँग्रेसने महागाईविरोधात देशव्यापी आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसचे वरिष्ठ नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले दिसले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबईत विधिमंडळासमोर आंदोलन करण्यात आलं. हा मोर्चा विधिमंडळापासून राजभवनकडे जाणार होता. मात्र, त्याआधीच पोलिसांनी काँग्रेस नेत्यांची धरपकड केली. नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काँग्रेसने ट्वीट करत महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना अटक केल्याची माहिती दिली आहे. ED सरकारच्या दबावतंत्रासमोर आम्ही झुकणार नाही, जनतेचे प्रश्न मांडण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही, असंही काँग्रेसने या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

आपल्या अन्य एका ट्वीटमध्ये काँग्रेसने पोलिसांनी विधानभवन परिसरातून काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतल्याचं म्हटलं. यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड, मोहन जोशी, देवानंद पवार, प्रमोद मोरे यांना ताब्यात घेतल्याचं नमूद करण्यात आलं.

बीडमध्येही काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन

काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं. देशात वाढलेली महागाई जीएसटी आणि अग्निपथ योजना रद्द करावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून देशामध्ये महागाई वाढली आहे. बेरोजगारीचा आकडा देखील वाढतोय. त्यामुळे सरकारने तात्काळ महागाई आणि जीएसटी कमी करा, अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

हेही वाचा : Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड एका क्लिकवर!

महागाई आणि दडपशाही या मोदींच्या धोरणाचा निषेध – यशोमती ठाकूर

काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या, “केंद्रातील मोदी सरकारने दुजाभाव करीत सामान्य जनतेचा छळ चालवला आहे. हे सरकार शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय करीत आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांनाही त्रास दिला जात आहे. आम्ही महागाई आणि दडपशाही या मोदींच्या धोरणाचा जाहीर निषेध करतो.”