तुम्हाला ‘ब्ल्यू’ नावाचा चित्रपट आठवतो? पाण्याखालील केवढय़ा तरी साहसी दृश्यांचा त्यात समावेश होता. अक्षयकुमार, संजय दत्त, लारा दत्ता, झायेद खान यांनी त्या धडाकेबाज दृश्यांसाठी ‘जान’ लावली होती.  त्याचे साहस दिग्दर्शन करणाऱ्या जेम्स बोमिलिक यांचा आता हिंदी, पंजाबी, तेलगू, तमिळ चित्रपट, तसेच उपग्रह वाहिनीवरील रिअ‍ॅलिटी शो, जाहिरातपट यांतून वावर वाढणार आहे. कारण त्यांनी आता येथेच आपली कर्तबगारी दाखवायचा निर्णय घेतला आहे.
साहस दिग्दर्शक याज्नेश शेट्टी त्यांचे मुंबईतील सगळे कामकाज सांभाळणार आहे, तर कराटे गुरू संजय गोकल यांनी त्यासाठी मुंबईत ‘अ‍ॅक्शनटेक’ या कराटे प्रशिक्षण शाळेची स्थापना केली आहे. जेम्स बोमालिक यांनी क्लाऊड अ‍ॅटलास, मिशन इम्पॉसिबल आयव्ही, ब्राऊन सुप्रमसी इत्यादी हॉलिवूड
चित्रपटांसाठी साहसी दृश्यांचे दिग्दर्शन केले.  

Story img Loader