तुम्हाला माहित्येय? मराठी चित्रपटाच्या गाण्याची ध्वनिफीत काढण्यास म्युझिक कंपनी फारसा रसच घेत नाहीत. जर घेतला तर चित्रपट प्रदर्शित झाला तरी त्या ध्वनिफिती बाजारात उपलब्धच नसतात.
कधी कधी तर चित्रपट पडद्यावरून उतरतो व मग त्याची गाणी हिट होतात..
‘नटरंग’चे गीत-संगीत-नृत्य वगळता मराठीच्या बाबतीत रडगाणीच फार. म्हणून तर बरेचसे दिग्दर्शक चित्रपटात गाणीच टाकत नाहीत.
म्हणून तर दिग्दर्शक समीत कक्कडने ‘आयना का बायना’मध्ये दोन-तीन नव्हे तर तब्बल आठ गाणी टाकल्याचा ‘सूर’ फार लागला. चित्रपटाचा विषयच संगीतबद्ध असल्याने ही नृत्यधमाल. त्यातील चार गाण्यांचे चित्रीकरण अगोदर करून मग त्यांचे ध्वनिमुद्रण करण्याची कमाल झाली. येथेही दिग्दर्शक दिसतो म्हणायचे. त्याच्या डोक्यात अख्खा सिनेमाच ‘खेळ’त राहिल्याशिवाय ही करामत शक्यच नाही. बॅकग्राऊंडला गाणी कशी येतील याचा त्याने ‘मस्त’ विचार केला असावा..
बाबा चव्हाण व जीतेंद्र जोशी यांच्या गीतांना अजित-समिरचे संगीत आहे. राकेश वसिष्ठ, अमृता खानविलकर, गणेश यादव, सचिन खेडकरसह नऊ ‘नाचणारी’ मुले यांच्या यात भूमिका आहेत.
इतकं सगळं छान जुळून येऊनही ध्वनिफीत प्रकाशन सोहळ्याला अमृता खानविलकर नसल्याने बेसूर वाटले..

Story img Loader