पारंपरिक मसालेदार हिंदी सिनेमा म्हणजे कल्पनेच्या कशाही, कितीही, कुठेही व कशालाही भराऱ्या.. ‘मैं रॉनी और जॉनी’ तशाच मार्गावरचा. ‘असे चित्रपट पाहताना डोके वापरू नये’ असा समीक्षकांचा कायम सल्ला असतोच. यात डॉनचा बेटा आपल्या आवडत्या युवतीच्या जवळपास येणाऱ्याचाही ‘गेम’ करण्यास तत्पर असतो. त्याचे नायिकेवरचे प्रेम खरे आहे, पण त्याच्या खिशात दमडी नाही. याच्या धडपडीत जॉनी सतत विघ्न घालतो वगैरे वगैरे. निर्माती नंदिता सिंघाच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश राम सिंहचे असून त्यात प्रियांशू चटर्जी, आदित्य बाळ, संदाली सिन्हा, सयाली भगत, शरद सक्सेना, आशीष विद्यार्थी आहेत.