‘चांदी’ चित्रपटाच्या ध्वनिफीत व वेबसाइट प्रकाशन सोहळ्यात पु. ल. देशपांडे यांची आठवण वातावरण बदलून टाकणारी ठरली. हा चित्रपट पुलंच्या ‘म्हैस’ या कथेवर आधारित आहे व हा सोहळा त्यांच्या जयंती दिनी म्हणजे ८ नोव्हेंबर रोजी आयोजित करून सुसूत्रता दाखवली..
एन. चंद्रा यांनी वेगळी आठवण सांगितली. त्यांचा ‘अंकुश’ हा पहिला चित्रपट १९८६ साली प्रदर्शित होत असताना नाना पाटेकरने पुढाकार घेऊन पुलंना तो दाखवला. त्यांनी तो आवडल्याचे एक पत्र लिहिले. चंद्रांना वाटले, त्यांच्या आनंदात आपण जनसामान्यांनादेखील सहभागी करूया. म्हणून एका मराठी वृत्तपत्रात ते प्रसिद्ध केले. दोनच दिवसांनी नॉव्हेल्टीत मॅटिनी खेळाला ‘अंकुश’ झळकला व पुढचे काही आठवडे ‘हाऊसफुल्ल’चा फलक कायम राहिला. पुलंच्या पत्रामुळे ‘अंकुश’ची ‘चांदी’ झाली (असेच म्हणायचे.)    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cut it ankush chi chandi